आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमानात एक अंशाने वाढ; शेतकरी उत्पन्नात 6 टक्क्यांनी घट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- हवामान बदलाचा सर्वात जास्त फटका भारतातील शेतकऱ्यांना बसतो आहे. संसदेत नुकत्याच सादर झालेल्या आर्थिक सर्वेक्षणात याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार ज्या वर्षी त्या भागात तापमान एक अंश सेल्सियसने वाढते तेव्हा खरिपात तेथील शेतकऱ्याचे उत्पन्न ६.२ टक्क्यांनी, तर रब्बीत सिंचनाची सोय असलेल्या जिल्ह्यांत ते ६ टक्क्यांनी घटते. याचप्रमाणे एखाद्या वर्षी त्या भागातील सरासरीपेक्षा १०० मिलिमीटर पाऊस कमी झाला तर खरिपात शेतकऱ्यांचे उत्पन्न १५ टक्क्यांनी तर रब्बीत ७ टक्क्यांनी घटते.  


बदलत्या हवामानाचा भारतीय शेतीवर परिणाम यासाठी  आर्थिक सर्वेक्षणात आंतरराष्ट्रीय अर्ध उष्णकटिबंधीय पीक संशोधन संस्था (इक्रिसॅट) आणि भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) यांनी मागील दशकभरात संयुक्तपणे केलेल्या संशोधनाअंती आलेल्या निष्कर्षाची आकडेवारी देण्यात आली आहे. त्यानुसार अति पाऊस किंवा अति तापमान अशा हवामानातील अति तीव्र बदलाचा (एक्स्ट्रिम वेदर) अनिष्ट परिणाम भारतीय शेतकऱ्यांचे उत्पन्नावर होतो. सर्वात जास्त फटका पावसातील बदलाचा बसतो. पाऊसमानातील अतितीव्र बदलामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांचे उत्पन्न १३.७ टक्क्यांनी घटते. असा प्रकार रब्बी हंगामात झाला तर उत्पन्न ५.५ टक्क्यांनी घटते. तापमानातील अशा बदलामुळे शेतकऱ्यांचे  उत्पन्न खरिपात ४.३ टक्क्यांनी, तर रब्बीत ४.१ टक्क्यांनी घटते. हवामान बदलाचा सर्वात जास्त फटका कोरडवाहू शेतकऱ्याला बसतो.

 

3 घटकांमुळे नुकसान
आर्थिक सर्वेक्षणानुसार, भारतीय शेतीवर हवामान बदलाचा सर्वात जास्त परिणाम तीन प्रमुख कारणांमुळे होतो. सरासरी तापमानातील वाढ, सरासरी  पर्जन्यमानातील घट  आणि मोसमी पावसात पडणाऱ्या खंडामुळे वाढणारे कोरडे दिवस. या तीन कारणांमुळे पिकांचे उत्पादन घटते आणि शेतकऱ्याला आर्थिक फटका बसतो.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, हवामान बदलाने शेती उत्पन्नातील घट...

बातम्या आणखी आहेत...