आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MPSC ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा 8 फेब्रुवारीला पुण्यात मोर्चा; सोशल मीडियावरही मोहीम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- राज्यसेवा परीक्षा देणाऱ्या तरुणांकडून येत्या 8 फेब्रुवारी रोजी पुण्यात मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने केवळ 69 जागांची जाहिरात काढलेल्या तरुणांनी सोशल मीडियावर हॅशटॅग मोहीम राबवत सरकारला धारेवर धरले आहे. ही गरीब घरातील विद्यार्थ्यांची थट्टाच असल्याची भावना या हॅशटँगच्या माध्यमातून विद्यार्थी व्यक्त करत आहेत. #mpscmahamorcha या हॅशटँगच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत आहेत. 

 

 

राज्यसेवेच्या पदांच्या संख्येत वाढ करण्यात यावी, संयुक्त परीक्षा रद्द करुन पुर्वीप्रमाणे एक हजारपेक्षा जास्त जागांची जाहिरात काढण्यात यावी. बायोमेट्रिक पध्दतीने उमेदवाराची हजेरी घ्यावी आदी मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. 

 

 

पुढील स्लाईडवर विद्यार्थ्यांच्या सोशल मीडियावरील हॅशटॅग मोहीमेचे फोटो

बातम्या आणखी आहेत...