आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त फेसबुक पोस्ट; औरंगाबाद पालिकेचे सहाय्यक नगररचना अधिकारी निलंबित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- नगरसेवक, महापालिका सभागृहाबद्दल फेसबुकवर अपमानकारक मजकूर टाकणारे नगररचना विभागाचे सहाय्यक नगर रचनाकार जयंत खरवडकर यांच्या निलंबनाचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी आयुक्तांना दिले आहेत. ‘नालायक लोकांना बोलायला सभागृह मिळाले की ते तत्वज्ञानी बनून बेछूट आरोप करतात. त्यालाच लोकशाही म्हणतात’ अशी फेसबुक पोस्ट त्यांनी टाकली होती. 

 

 

फेसबुकवरील या लिखाणामुळे सभागृहाचा अवमान झाला असल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी नगरसेवकांनी केली. ११ नगरसेवकांनी मते मांडली, सर्वांची बाजू ऐकल्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी सहाय्यक नगररचना अधिकारी जयंत खरवडकर यांना निलंबन करण्याचे आदेश आयुक्तांना दिले. 

 

 

फेसबुकवरील माझी जी पोस्ट आहे. त्याबाबत गैरसमज पसरवण्यात येत आहे. पालिका कामकाजाशी त्याचा संबंध नाही. दोन दिवसांपूर्वी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू असताना त्यावर कमेंट करण्यात येत होत्या. ते पाहून मी व्यथित झालो आणि त्यामुळे ती पोस्ट केली असल्याचा खुलासा खरवडकर यांनी लेखी पत्राच्या माध्यमातून केला होता. खरवडकर यांच्या खुलाशावर सर्वसाधारण सभेत चर्चा करण्यात आली. ११ नगरसेवकांनी त्यावर आपले मत मांडले. त्यापैकी नऊ सदस्यांनी खरवडकर यांच्या विरोधात, तर दोन सदस्यांनी त्यांच्या बाजूने मत मांडले. जयंत खरवडकर यांनी भारतीय संसदेबाबत आपण पोस्ट केली असल्याचा खुलासा केला होता. त्यावर देशातील सर्वोच्च सभागृहाचा हा अवमान असल्याचा आक्षेप घेत नगरसेवकांनी निलंबनाची मागणी लावून धरली होती. त्यावर खरवडकर यांचा खुलासा अमान्य करत महापौर नंदकुमार घोडेले यांनी निलंबनाचे आदेश दिले.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...