आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचराकोंडीच्या 'शंभरी'ला मनपानेच थांबवले १७० कंपोस्टिंग पिटचे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नारेगावकरांनी केलेल्या आंदोलनामुळे झालेल्या कचराकोंडीला शनिवारी तब्बल १०० दिवस पूर्ण झाले. कचराकोंडीला शंभरी उलटली तरी विल्हेवाटीची कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात महापालिकेला यश आले नाही. उलट शहरात ठिकठिकाणी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारल्या जाणाऱ्या ४३० पैकी १७० कंपोस्टिंग पिटचे काम शनिवारी थांबवण्यात आले. त्यासाठी पावसाळा   सुरू होणार असल्याने दुर्गंधी सुुटण्याचा धोका असल्याचे कारण १०० दिवस हातावर हात ठेवून बसलेल्या महापालिकेने पुढे केले आहे. 
शहरात ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ४३० कंपोस्टिंग पिट तयार करण्यात येणार होते. मात्र पिटची चौकशी सुरू असल्याने तसेच पावसाळा सुरू होणार असल्याने १७० कंपोस्टिंग पिटची कामे थांबवण्यात आली आहेत. आतापर्यंत २३० पिट पूर्ण झाले असून उर्वरित ३० पिट अर्धवट आहेत. ते पूर्ण करण्यात येणार असल्याचे घोडेेले यांनी सांगितले. १६ फेब्रुवारीला नारेगावकरांनी आंदोलन सुरू केले तेव्हापासून शहराची कचराकोंडी झाली. त्याला शनिवारी १०० दिवस पूर्ण झाले. परंतु या १०० दिवसांत महापालिकेने कचरा उचलून इकडून तिकडे टाकण्यापलीकडे काहीही केले नाही. 


नव्या आयुक्तांचा प्रबोधनावर भर 
महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी पदभार घेतल्यापासून कचऱ्याच्या प्रश्नाकडे विशेष लक्ष दिले. तीन महिन्यांनंतरही अनेक वॉर्डांमध्ये नागरिक ओला व सुका कचरा रस्त्यावर फेकत आहेत. नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी आयुक्तांनी देशभर उल्लेखनीय कार्य केलेल्या दिल्लीच्या संस्थेला शनिवारी पाचारण केले. संस्थेचे प्रमुख अजय सिन्हा टीमसह दुपारी मनपात आले. त्यांच्याशी नगरसेवकांची भेट घडवून आणण्यात आली. 


१०० दिवसांत महापालिकेने काय केले? 
१ कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी १०० दिवसांचा अवधी हा त्या मानाने मोठाच म्हणावा लागेल. त्यातच सरकारने महापालिकेला ८६ कोटी रुपये देण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे पैशांची कमतरता नव्हती. फक्त तातडीने निर्णय घेण्याची गरज होती. यातच मनपा कमी पडली. 
३ आज मे महिना संपत असतानाही महापालिका कचरा प्रक्रियेचे यंत्र कार्यान्वित करू शकली नाही. या १०० दिवसांत महापौर नंदकुमार घोडेले दररोज सकाळी साडेपाच वाजेपासून शहरात फिरत, अधिकारी-कर्मचाऱ्यांना आदेश देत. परंतु आयुक्तच नसल्याने निर्णय झाले नाहीत. परिणामी आपण १६ फेब्रुवारीला जेथे होतो तेथेच आजही आहोत. 


आता काय होऊ शकते? 
१ २७ यंत्रे खरेदी करून तातडीने कार्यान्वित केली तर कचऱ्याचा प्रश्न मिटेल. मध्यवर्ती जकात नाक्यासारखे जेथे कचऱ्यावर जागीच प्रक्रिया व त्याचे खत झाल्याचा दावा मनपा करतेय ते खत तातडीने हलवले पाहिजे. कारण पाऊस पडल्यास त्यातून दुर्गंधी पसरण्याचा धोका आहे. 
३ दुसरीकडे नारेगाव येथे अजून कचऱ्यावर प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. तेथील कचरा नष्ट करून ३१ मार्चपूर्वी तेथे हिरवळ निर्माण झालेली असेल, असेही महापालिकेने त्याच शपथपत्रात म्हटले होते. त्याचेही स्मरण ठेवण्याची गरज आहे. 


२ यंत्र खरेदीचा निर्णय ९ मार्चला झाला. अत्यावश्यक बाब म्हणून पंधरा दिवसांत ही यंत्रे खरेदी करून कार्यान्वित करता आली असती. परंतु तत्कालीन आयुक्तांनी निर्णय घेतला नाही. कम्पोस्ट पिट तयार करण्यासाठी अत्यावश्यक कामांसाठीचे कलम वापरले, यंत्र खरेदीसाठी वापरले नाही. 


२ २७ यंत्र खरेदी ही तात्पुरती उपाययोजना होती. कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी अजून निविदा प्रक्रिया झाली नाही. ती तातडीने व्हावी. कारण ३१ मार्च २०१८ ला कचरा समस्या दूर होऊन गॅस प्रकल्प कार्यान्वित होईल, असे शपथपत्र मनपाने कोर्टात दिले आहे. 

बातम्या आणखी आहेत...