आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हात वर करून सांगा मुख्यालयी कोण-कोण राहते? ग्रामसेवक-तलाठ्यांचे हात खालीच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खुलताबाद- आमसभेला उपस्थित असलेल्या तलाठी व ग्रामसेवकांना  हात वर करून सांगा की नेमलेल्या गावात किती जण अन् मुख्यालयी  किती जण राहतात? त्यावर उपस्थित असलेल्या सर्व तलाठी, ग्रामसेवकांपैकी कुणीही हात वर केले नाहीत. याचा अर्थ नेमून दिलेल्या गावात कोणतेही तलाठी किंवा ग्रामसेवक राहत नसल्याची धक्कादायक बाब आमसभेत समोर आली. आमदार प्रशांत बंब यांच्या उपस्थितीत पंचायत समितीच्या प्रांगणात आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. यात बँक अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश आमदारांनी दिले. यासह पिण्याचे पाणी व रस्ते विकासाच्या कामांवर आमसभेत चर्चा झाली.  पुढील आमसभा ५ मे रोजी घेण्यात येणार असल्याचे आमदारांनी घोषित केले.    

 

या सभेला जिल्हा परिषद  सदस्य प्रा. सुरेश सोनवणे, एल.जी.गायकवाड, नगराध्यक्ष अॅड. एस.एम.कमर, सभापती अर्चना अंभोरे, उपसभापती गणेशनाना आधाने, उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, तहसीलदार अरुण जऱ्हाड, गटविकास अधिकारी ज्ञानोबा मोकाटे, पोलीस निरीक्षक हरीश खेडकर, अॅड.कैसरोद्दीन यांची प्रमुख उपस्थिती होती.   


 आमसभा सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम तलाठी व ग्रामसेवक मुख्यालय थांबतात का, याची चौकशी आमदार बंब यांनी केली  व उपस्थित असलेल्या सर्व तलाठी व ग्रामसेवकांना नेमलेल्या गावांमध्ये किती जण मुख्यालय राहतात, अशा तलाठी व ग्रामसेवकांनी हात वर करावे असे सुचवले होते. यावर एकाही तलाठी व ग्रामसेवकाने हात वर केले नाहीत. यानंतर यापैकी किती औरंगाबाद येथे राहतात त्यांनी हात वर करावे, असे सांगताच निम्म्यावर तलाठी व ग्रामसेवकांनी हात वर केले. तलाठी ग्रामसेवकांवर गावाची जबाबदारी असते. असे असताना एकही तलाठी ग्रामसेवक मुख्यालय न राहता औरंगाबाद येथून ये-जा करतात हा विषय गंभीरतेने घेऊन सर्वांना मुख्यालयी राहण्याचे सुचवले.

 

दांडीबहाद्दर अधिकाऱ्यांना नोटिसा  बजावण्याचे आदेश  
 महाराष्ट्रभरात कर्जमाफीचा गंभीर विषय सुरू आहे. खुलताबाद तालुक्यातील शेतकरी कर्जमाफीसाठी विविध बँकांत खेटे मारत आहेत. यासाठी खुलताबाद पंचायत समितीच्या प्रांगणावरील आमसभेत विविध बँकांच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्यासाठी सुचवले होते तसे पंचायत समितीच्या वतीने पत्रेही काढण्यात आले होते. असे असतानाही एकही बँक अधिकारी किंवा कर्मचारी आमसभेला उपस्थित राहिला नाही. यामुळे आमदार प्रशांत बंब यांनी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांना दांडीबहाद्दर अधिकाऱ्याविरोधात पत्र पाठवून बँकांच्या गैरहजर अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेशित केले.  

 

धाड नदी येसगाव प्रकल्पाला जोडण्याची मागणी  
 खुलताबाद शहरासह तालुक्यातील १८ खेड्यांना पाणीपुरवठा करणारा येसगाव प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत नाही. यामुळे दिवसेंदिवस पाण्याची समस्या बिकट होत आहे. त्यामुळे पाणीटंचाईचा मुद्दा काही महिलांनी खुलताबाद येथे आयोजित आमसभेत मांडला. तसेच बाजारसावंगी, ताजनापूर  येथून जाणारी धाड नदी येसगाव प्रकल्पात जोडावी, अशी विनंती केली. यावर आमदार बंब यांनी हा विषय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मांडलेला आहे. लवकरच हा विषय मार्गी लागेल, असे सांगितले.  

 

बातम्या आणखी आहेत...