आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत कुंटणखान्यावर बीड पोलिसांचा छापा, तीन महिलांची सुटका; आंटीसह एक ग्राहक अटकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- औरंगाबाद शहरात चालणाऱ्या एका कुंटखान्यावर बीडच्या पोलिस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी प्रतिबंध वाहतूक शाखेच्या पथकाने रविवारी दुपारी छापा मारुन तीन महिलांची सुटका केली. यात एका ग्राहकासह आंटीला पोलिसांनी अटक केली आहे. 


औरंगाबाद शहरातील आकाशवाणी रोडवरील अहिंसा कॉलनीत एक महिला कुंटणखाना 
चालवत असल्याची माहिती बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. यावरुन रविवारी पोलिस उपअधीक्षक भरत गाडे, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे प्रमुख पोलिस निरीक्षक अनिलकुमार जाधव, पोलिस उपनिरीक्षक भरत माने यांच्यासह कर्मचाऱ्यांनी अहिंसा नगर भागात छापा मारला. यावेळी शोभा वसंत शुक्ला (वय ५३) या आंटीला पोलिसांनी अटक करत तीन महिलांची सुटका केली. सुटका केलेल्या सर्व महिला औरंगाबादच्याच रहिवासी आहेत. यावेळी राजेंद्र आसाराम दराडे या ग्राहकालाही अटक करण्यात आली. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.