आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुजंगराव हे न झुकता काम करणारे अधिकारी; शतकपूर्तीनिमित्त न्या.चपळगावकर यांचे मत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कोणत्याही राजवटीच्या समोर ताबडतोब झुकणे हा हल्ली स्वभाव झाला आहे. भुजंगरावांनी निझाम राजवट आणि स्वातंत्र्योत्तर राजवटीतही काम केले. मात्र दोन्ही राजवटींमध्ये कोणासमोरही आपला स्वाभिमान न झुकवता भुजंगरावांनी काम केले. हा कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याच्या जीवनातला सर्वात मोठा गुण असल्याचे मत न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी व्यक्त केले. ते भुजंगराव कुलकर्णी यांच्या शतकपूर्तीनिमित्त आणि 'मी, मराठवाडा आणि महाराष्ट्र' पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीच्या प्रकाशनावेळी बोलत होते. 


या वेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पुरुषोत्तम भापकर, एस. बी. वराडे, बॅ. जवाहरलाल गांधी, प्रदीप देशमुख,राम भोगले,या.रा. जाधव, उत्तम काळवणे, राजाभाऊ घाट,सुभाष झंवर यांची उपस्थिती होती. चपळगावकर म्हणाले, निझाम राजवटीत कुठेही राजकीय,सांस्कृतिक स्वातंत्र्य नव्हते. त्यानंतर स्वातंत्र्याच्या अपेक्षाला उधाण आले. अशा दोन्ही राजवटीत त्यांनी काम केले. माझ्या दृष्टीने पूज्यभाव म्हणजे त्यांनी दोन्ही राजवटीत त्यांचा स्वाभिमान कधीही न झुकवता काम केले. भंडारदरा धरण लिकेज झाल्यानंतर काही तासांत त्यांनी तिथे पोहोचून यंत्रणा हलवून धरण वाचवले. आज असे अधिकारी आहेत म्हणून शासन सुरू आहे. बालगंधर्व रंगमंदिर आहे तिथे झोपडपट्टी वसवणार होते एका नागरिकांचा सामान टाकत असल्याचे फोन आल्यानंतर दोन तासांत त्यांनी त्या व्यक्तीला अटक करत सर्व सामान हलवले. त्यामुळे आज रंगमंदिर तिथे आहे. गतिमान पद्धतीने काम करण्याची त्याची कार्यपद्धती असल्याचे त्यांनी सांगितले. सारंग टाकळकर यांनी सूत्रसंचालन केले. 


प्रशासनाने आदर्श घ्यावा
भुजंगरावांचा आदर्श प्रशासनाने घेतला पाहिजे. त्याचे आयुष्यावर कर्तृत्वाचा प्रभाव आहे, असे सांगत बागडे यांनी 'भूमातेच्या सेवेत तुम्ही रमलात, जंग गंज मनी कधी नाही धरलात, गवसला सूर समर्पित जीवनाचा, राजस्व अभियानाचा जनसेवेचा, वसा घेतला श्रमाचा लोकशाहीचा, म्हणून शंभरीचे दान तुम्हाला, शंभरीचे दान..' ही कविता सादर केली. 


तुमचे प्रेम हीच आयुष्याची कमाई 
कुलकर्णी म्हणाले की, तुमच्या सर्वांचे प्रेम हीच माझ्या आयुष्याची कमाई आहे. यशवंतराव चव्हाणांसोबतचा काम करताना जो अनुभव आला तो दुसऱ्या कोणासोबत आला नाही. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सांभाळले तर राज्य चांगले चालणार. लोकशाही ज्यांच्या खांद्यावर चालते त्यांना सांभाळावे लागते. 

बातम्या आणखी आहेत...