आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसचे ब्रेक फेल, नदी काठी अडकली; पंचवीस विद्यार्थी बालंबाल बचावले...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आडूळ- जयहिंद पब्लिक स्कूल सुंदरवाडी (ता.औरंगाबाद) येथे सोमवार (दि.१९) रोजी शिवजयंतीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला स्कूल बसने आडूळ, आडूळ तांडा, अब्दुल्लापूर तांडा, पांढरी पिंपळगाव, चित्तेपिंपळगाव, आपतगावसह इतर ठिकाणचे विद्यार्थी गेले होते. ते कार्यक्रम आटोपून बस क्रमांक एम.एच २०  एक्स ए १६९४ ने दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास एकूण २५ विद्यार्थी परत येत होते. 


यानंतर आडूळ तांडा येथील तीन विद्यार्थी सोडल्यावर बस आडूळ खुर्द मार्गे अब्दुल्लापूर येथील विद्यार्थी सोडण्यासाठी जात होती. बस आडूळ खुर्द गावाजवळ येताच बसचे ब्रेक फेल झाले. त्यात गावात एक लग्न समारंभ असल्याने बस चालक उत्तम भानदास आहेर (रा.आडूळ) याने वेळीच प्रसंगावधान राखून बस लग्न समारंभाकडे न वळविता येथील ईदगाह मैदान रस्त्याकडे वळविली. या रस्त्यावरील मातीच्या ढिगाऱ्यावर बस अडकल्याने पुढील दुर्घटना टळली. जर बस या ढिगाऱ्यावर अडकली नसती तर पुढे मोठी नदी आहे. या नदीची खोली २५ फूट खोल असून ज्याठिकाणी ही बस थांबली तेथून ही दरी अवघ्या काही फुटांवरच होती. 

बातम्या आणखी आहेत...