आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 दिवसांचा साचला 2000 टन कचरा; डॉक्टरांच्या रजा केल्या रद्द, खासगी रुग्णालयेही सतर्क

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- नारेगावात कचरा टाकणे बंद केल्यावर पर्यायी जागा उपलब्ध करून घेण्यात मनपा प्रशासनाला आलेले अपयश यामुळे शहरात ५ दिवसांचा म्हणजे १६ ते २० फेब्रुवारीपर्यंतचा सुमारे २००० टन कचरा जागोजागी साठला. यातून १५ लाख औरंगाबादकरांचे आरोग्य धोक्यात अाले आहे. गंभीर परिस्थिती उद््भवल्याचे लक्षात आल्यावर मनपा प्रशासनाने मंगळवारी डॉक्टरांच्या रजा रद्द केल्या. खासगी रुग्णालयांनाही सतर्कतेचे आदेश दिले आहेत.   


नारेगावऐवजी पर्यायी जागा शोधण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी महापालिकेला १६ फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली होती. म्हणून ग्रीन इंडिया कंपनीच्या बाभूळगाव (पैठण रोड) येथील खासगी २५ एकर जागेवर कचरा टाकण्याचा प्रस्ताव १५ रोजी मंजूर झाला. मात्र, ग्रामस्थांनी विरोध केल्याने पहिल्याच दिवशी  मोहीम बारगळली. त्यानंतरच्या चार दिवसांत प्रशासनाने कोणतीही हालचाल केली नाही. परिणामी रोज ४०० टन असा २००० टन कचरा ठिकठिकाणी साठला. सेंट्रल नाका भागात ढिगारे जमले. पाहणी केल्यावर महापौरांना आरोग्याचा प्रश्न गंभीर झाल्याचे लक्षात आले. आरोग्य विभागासाठी आपत्कालीन स्थिती घोषित केली. बुधवारी पोलिस बंदोबस्तात नारेगाव येथेच कचरा टाकण्याच्या हालचाली सुरू केल्या. 
 

या केल्या उपाययोजना 
- मनपा रुग्णालयातील सर्व डॉक्टरांच्या रजा रद्द 
- मनपा रुग्णालये, आरोग्य केंद्राचे बाह्यरुग्ण विभाग सुरू राहणार. खासगी रुग्णालयांचीही मदत.
- मांस विक्रीची दुकाने काही दिवस बंद राहणार 
- बुधवारी उघड्या असलेल्या शहरातील मांस विक्री दुकानांवर कारवाई  
- संपूर्ण शहरात पुन्हा प्लास्टिक बंदी लागू.
- कचरा साठलेल्या भागात दुर्गंधीपासून बचावासाठी २ लाख मास्कची खरेदी. 

बातम्या आणखी आहेत...