आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक अर्जासाेबत ‘बामू’ची बोगस पदवी सादर करणाऱ्या केनियन खासदाराचे पद रद्द

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद -   डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची (बामू) बोगस पदवी सादर केल्याप्रकरणी केनियाच्या एका खासदाराचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. फ्रँकलिन मिथिका लिनतुरी (४५) असे या खासदाराचे नाव आहे. २०१६ मध्ये नॅशनल अलाइन्स पार्टीच्या उमेदवारीवर मेरू इयंबे शहरातील दक्षिण मतदारसंघातून त्याने निवडणूक जिंकली होती. निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या पदवीवर त्याच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने आक्षेप घेतला हाेता.

 

त्याआधारे  या प्रकरणाच्या तपासाचे काम इंटरपोलकडे सोपवण्यात आले. तपासाअंती त्याला विद्यापीठाने पदवी बहाल केलेली नाही, असा जबाब विद्यापीठ प्रशासनाने गुन्हे शाखेकडे नोंदवला आहे.    


फ्रँकलिनने २००१ मध्ये विद्यापीठाच्या बहिःस्थ बीकॉम अभ्यासक्रमास प्रवेश घेतला होता. त्यासाठी औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयात अर्ज भरला होता. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी प्राचार्यांचा जबाब नोंदवला. मात्र, त्या वेळी अशी सुविधा महाविद्यालयात नव्हतीच, असे त्यांनी स्पष्ट केले. तरीही त्याने बीकाॅम उत्तीर्ण झाल्याची पदवी मिळवली. त्या पदवीच्या आधारे त्याने केनियातील नैरोबी येथील विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि वकिलीची पदवीही संपादित केली.

 

  विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर पदवी ही औरंगाबादमधून मिळवण्यात आल्यामुळे त्याविषयी महाराष्ट्र शासनाला कळवण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण पुणे सीआयडीकडे सोपवण्यात आले. त्यांनी औरंगाबाद पोलिस मुख्यालयाशी संपर्क साधल्यानंतर गुन्हे शाखेने हा तपास केला.  केनियन दूतावासाचे अधिकारीही शहरात तपास करून गेले. दोन दिवसांपूर्वी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा अंतिम अहवाल सादर केला.

 

केनियन सरकारने फ्रँकलिनला खासदार म्हणून मिळणाऱ्या सर्व सोई-सुविधा थांबवल्या आहेत. शिवाय भारताच्या बीकाॅमच्या धर्तीवर मिळालेली वकिलीची पदवीही परत घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.   

 

पदवीवर ‘मराठवाडा विद्यापीठ’ उल्लेख  
फ्रँकलिनने सादर केेलेल्या पदवीवर मराठवाडा विद्यापीठ असे नाव आहे. विशेष म्हणजे त्याने २००१ मध्ये ही  पदवी घेतल्याचे नमूद केले होते. मात्र १९९४ मध्येच विद्यापीठाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असे नामांतर झाले. त्यामुळे ही पदवी बोगस असल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांच्या लक्षात आले. अधिक स्पष्टीकरणासाठी गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या पथकाने देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि विद्यापीठातील संबंधित विभागाचे जवाब नोंदवले. त्याचा अहवाल शासनाकडे सादर केला.

 

त्याने बीकाॅम उत्तीर्ण झाल्याची पदवी मिळवली. त्या पदवीच्या आधारे त्याने केनियातील नैरोबी येथील विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि वकिलीची पदवीही संपादित केली.  विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर पदवी ही औरंगाबादमधून मिळवण्यात आल्यामुळे त्याविषयी महाराष्ट्र शासनाला कळवण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण पुणे सीआयडीकडे सोपवण्यात आले. त्यांनी औरंगाबाद पोलिस मुख्यालयाशी संपर्क साधल्यानंतर गुन्हे शाखेने हा तपास केला.

 

केनियन दूतावासाचे अधिकारीही शहरात तपास करून गेले. दोन दिवसांपूर्वी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा अंतिम अहवाल सादर केला. केनियन सरकारने फ्रँकलिनला खासदार म्हणून मिळणाऱ्या सर्व सोई-सुविधा थांबवल्या आहेत. शिवाय भारताच्या बीकाॅमच्या धर्तीवर मिळालेली वकिलीची पदवीही परत घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.   

 

बातम्या आणखी आहेत...