आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मित्राकडून हिसकावलेली चेन तारण; कर्ज घेऊन झाला फरार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- वयाने लहान असलेल्या मित्राची सोन्याची चेन हिसकावून ती गोल्ड लोन कंपनीत तारण ठेवून पैसे घेऊन मित्र फरार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सतरावर्षीय मुलाच्या तक्रारीवरून मित्रविहार कॉलनीतील ऋषी नामक तरुणावर जवाहरनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 


तक्रारीनुसार, ४ महिन्यांपूर्वी साहिलची ऋषीसोबत ओळख झाली होती. लग्नासाठी पैसे पाहिजे असल्याचे तो साहिलला बोलला होता. एकेदिवशी तो साहिलच्या गळ्यातील चेन ओढू लागला. साहिलने विरोध करताच धमकी देऊन चेन हिसकावत तो पसार झाला. हा प्रकार त्याने पोलिस अधिकारी असलेल्या वडिलांना सांगितला. तेव्हा चेन पैठण गेट येथील एका गोल्ड लोन कंपनीत गहाण ठेवून पैसे घेऊन ऋषीफरार झाला असल्याचे समोर आले. त्यानंतर साहिलने जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस ऋषीचा शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...