आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत बदल, विविध भागांत शोभायात्रा, बंदोबस्तासाठी 1400 पोलिस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शिवजयंतीनिमित्त शहरातील विविध भागांतून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून मार्गात बदल करण्यात आला आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून १४०० पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. 


क्रांती चौक, औरंगपुरा, सिटी चौक, टीव्ही सेंटर, मुकुंदवाडी, चिकलठाणा, वाळूज आदी ठिकाणी शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी दोन पोलिस उपायुक्त, पाच सहायक पोलिस आयुक्त, १९ पोलिस निरीक्षक, १३१६ पोलिस कर्मचारी, ७५ महिला कर्मचारी, राज्य राखीव दलाचे जवान आणि होमगार्डदेखील बंदोबस्तासाठी असणार आहेत.


पर्यायी मार्ग असे...
शहागंजकडून सिटी चौककडे येणाऱ्या वाहनांसाठी चेलीपुरा चौक, लोटाकारंजा-कामाक्षी लॉज चौक.  क्रांती चौक, गुलमंडी-सिटी चौककडे जाणाऱ्या वाहनांसाठी सावरकर चौक-कार्तिकी हॉटेल चौक-मिल कॉर्नर-भडकल गेट. मिलकॉर्नरकडून औरंगपुऱ्याकडे जाणारी वाहने अंजली सिनेमागृहजवळून उजवीकडे नागेश्वरवाडी, डॉ. खनाळे रुग्णालय, निराला बाजार, समर्थनगर किंवा अंजली सिनेमागृहापासून डावीकडे खडकेश्वर, मनपामार्गे जातील.  जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टीव्ही सेंटरकडे जाणाऱ्या वाहनांनी अण्णाभाऊ साठे चौक, उद्धवराव पाटील चौक, सिद्धार्थ चौक या मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे. 

 

या मार्गावर वाहतूक बंद 
>राजाबाजार चौक, संस्थान गणपती, शहागंज- गांधीनगर, सराफा, सिटी चौक, गुलमंडी, बारभाई ताजिया-पैठण गेट, भडकल गेट , सिल्लेखाना चौक ते क्रांती चौक. 
>एन-१२ नर्सरी, टीव्ही सेंटर चौक, जिजामाता चौक, एम-२, एन-९, शिवनेरी कॉलनी, पार्श्वनाथ चौक, बळीराम पाटील चौक, जयभवानीनगर चौक ते गजानन मंदिर चौक, सेव्हन हिल्स उड्डाणपूल ते जवाहरनगर पोलिस ठाणे चौक. 

बातम्या आणखी आहेत...