आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक शहर विकास अाराखड्यातील बदलांसाठी घेणार बैठक: मुख्यमंत्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिक शहर विकास अाराखड्यातील अपेक्षित बदलांसाठी लवकरच बैठक घेण्याची हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी नाशिकमध्ये दिली. यामुळे एप्रिलपासून महापालिकेने पाठविलेला बदलांबाबतचा प्रस्ताव लवकरच मंजूर हाेण्याची शक्यता असून, शहर विकासाला अडसर ठरत असलेला एक माेठा प्रश्न अागामी काळात मार्गी लागण्याची चिन्हे अाहेत.

 
क्रेडाईतर्फे डाेंगरे वसतिगृह मैदानावरील ‘शेल्टर २०१७’ प्रदर्शनाचा समाराेप मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बाेलत हाेते. नाशिकचा नवा विकास अाराखडा प्रकाशित हाेण्याअाधीच फुटल्याने माेठा गाेंधळ झाला हाेता. या अाराखड्यात पार्किंग, टीडीअारचा वापर, साइड मार्जिन यांसारख्या अवास्तव बाबींमध्ये जवळपास साेळा बदलांचा प्रस्ताव महापालिकेने एप्रिलमध्ये राज्य शासनाकडे पाठविलेला अाहे. मात्र, अद्यापही त्याला अंतिम स्वरूप अालेले नाही. त्यामुळे शहराचा विकास काही अंशी ठप्प झाला अाहे. त्यामुळे विकास अाराखडा बदलण्याची मागणी सातत्याने हाेत अाहे, त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमातून नाशिककरांना अाश्वस्त केले.

 

विकास अाराखड्यातील अपेक्षित बदल करू, जेणेकरून येथील बांधकाम व्यवसायाला चालना मिळाली पाहिजे अाणि त्यातून लाेकांनाही परवडणारी घरे मिळाली पाहिजे याकडे त्यांनी लक्ष वेधले. व्यासपीठावर अामदार देवयानी फरांदे, अामदार बाळासाहेब सानप, अामदार सीमा हिरे, अामदार डाॅ. राहुल अाहेर, महापाैर रंजना भानसी, क्रेडार्इचे अध्यक्ष सुनील काेतवाल, शेल्टरचे समन्वयक उदय घुगे हाेते. 


समृद्धी महामार्गाचे काम फेब्रुवारीत करणार सुरू 
समृद्धीमहामार्ग महाराष्ट्राचे चित्र बदलणार अाहे. ५० टक्क्यांपेक्षा जास्त जमिनी यासाठी अापल्या ताब्यात येतील असे सध्याचे चित्र अाहे. यानंतर निविदा प्रक्रिया राबविली जाईल अाणि फेब्रुवारीपर्यंत प्रत्यक्षात कामाला सुरुवात हाेईल. हा महामार्ग राज्याला देशात २० वर्षे पुढे घेऊन जाईल अशी त्याची शक्ती अाहे. नाशिकसाठी या मार्गासाठी डेडिकेटेड कनेक्टर द्यावा अशी क्रेडाईने मागणी केली, यावरून तुम्ही किती दूरदृष्टी ठेवून अाहात हे लक्षात येते. लवकरच असा कनेक्टर कसा देता येईल यासाठी अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या जातील, असे फडणवीस यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...