आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिरंजीवी प्रसाद औरंगाबादचे नवे पोलिस आयुक्त, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर सोशल मीडियात चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद -नांदेड विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीवी प्रसाद यांची औरंगाबादचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती होणार असल्याची चर्चा सोशल मीडियात सुरु आहे. 11 मे रोजी औरंगाबादेत उसळलेल्या दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर शहराला तात्काळ पोलिस आयुक्त द्या अशी मागणी सगळ्यात पक्षांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. 

 

आमदारांच्या एका शिष्टमंडळानेदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस    यांची नुकतीच भेट घेतली होती. यावेळी मुख्यंत्र्यांनी त्यांना दोन दिवसांत शहराला पोलिस आयुक्त देण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर सोशल मीडियात चिरंजीवी प्रसाद यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चिरंजीवी प्रसाद यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अद्याप आपल्याला आदेश प्राप्त झालेले नाही हे सांगतानाच उद्या ते मिळण्याची शक्‍यता असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील कचरा प्रश्‍नावरून मिटमिटा पडेगाव येथे झालेल्या दंगली त्यात दोघांचा बळी गेला, तर दहा कोटी रुपयांच्या मालमत्तेची देखील राखरांगोळी झाली. या प्रकरणी तत्कालीन पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना शासनाने सक्तीच्या रजेवर पाठवले होते. मात्र कालवधी संपल्यानंतरही ते रूजू झाले नाही. तर दोन समाजात या दंगलीने तेढ निर्माण झाल्यामुळे संवेदनशील शहराला पुर्णवेळ पोलिस आयुक्त न दिल्यामुळे मुख्यमंत्री व गृहविभागावर चौफेर टिका झाली होती.  

 

 

बातम्या आणखी आहेत...