आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक- डिसेंबरच्या अखेरीस केदा अाहेर यांच्या चेअरमनपदी निवडीनंतर जिल्हा बँकेसमाेर फटाक्यांची अातषबाजी झाली हाेती. मात्र, त्यानंतर अवघ्या अाठच दिवसांनी जिल्हा बँकेचे संचालक मंडळ सहकार विभागाकडून बरखास्त करण्यात अाले हाेते. यामुळे अाहेर यांचे पद अाैटघटकेचे ठरल्याची चर्चा हाेती. मात्र, बरखास्तीचा हा निर्णय अन्याय्य वाटल्याने या संचालकांनी उच्च न्यायालयात या कारवार्इला अाव्हान दिले गेले. न्यायालयाने मंगळवारी बरखास्तीच्या या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर गुरुवारी बँकेचे अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा केदा अाहेर यांनी पदभार स्वीकारताच बँकेसमाेर दीड महिन्यात दुसऱ्यांदा फटाक्यांचा धुरळा उडाल्याचे पहायला मिळाले.
जिल्ह्याची अर्थवाहिनी समजली जाणाऱ्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नाेटबंदी अाणि रखडलेल्या कर्जमाफीमुळे खऱ्या अर्थाने अार्थिक अडचणीत अाल्याचे चित्र गतवर्षी पहायला मिळाले. याचदरम्यान डिसेंबर महिन्यात तत्कालीन चेअरमन नरेंद्र दराडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या चेअरमनपदावर केदा अाहेर यांची वर्णी लागली हाेती. मागील चाैकशींच्या ससेमिऱ्यातून बँकेच्या झालेल्या अार्थिक नुकसानीपाेटी, कलम ८८ च्या नाेटिसा संचालक मंडळाला बजावण्यात अाल्या हाेत्या. अाहेर यांनी सूत्रे स्वीकारायला अाठ दिवस हाेत नाहीत ताेच संचालक मंडळ बरखास्त करत सहकार विभागाने प्रशासक म्हणून मिलिंद भालेराव यांची नियुक्ती केली गेली. या कारवार्इला अाव्हान देत संचालक मंडळाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली हाेती. यावर न्यायालयाने या कारवार्इला स्थगिती दिली. त्यानंतर गुरुवारी दुपारी संचालक मंडळाने बँकेत येत पदभार स्वीकारला. चेअरमन केदा अाहेर यांच्यासह संचालकांनी सर्वच विभागप्रमुखांची तातडीची अाढावा बैठकही घेतली. यावेळी उपाध्यक्ष सुहास कांदे, संचालक गणपत पाटील, शिरीषकुमार काेतवाल, नरेंद्र दराडे, अामदार सीमा हिरे, शाेभा बच्छाव, संदीप गुळवे, परवेज काेकणी, किशाेर दराडे, दिलीप बनकर, धनंजय पवार उपस्थित हाेते.
वसुलीबाबत कडक धाेरण
न्यायालयाच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा कामकाजाची संधी मिळाली असून सगळ्या घटकांना साेबत घेऊन कामकाज केले जार्इल. चुकीच्या पद्धतीने काेणतेही काम हाेणार नाही याची दक्षता घेतली जार्इल. बॅँकेबद्दल पुन्हा एकदा विश्वासाचे वातावरण तयार व्हावे, यासाठी प्रयत्न केले जाणार असून वसुलीबाबत कडक धाेरण स्वीकारले जाणार अाहे. यात काेणताही दुजाभाव न करता बँकेच्या हिताला प्राधान्य दिले जाणार असून लगेचच सर्वच विभागप्रमुखांची तातडीची बैठक घेत असल्याचे चेअरमन केदा अाहेर यांनी यावेळी स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.