आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे मनपा आयुक्त ब्लॉग लिहून होतात व्यक्त !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नियमित ब्लॉग लिहिणे, फावल्या वेळात सांस्कृतिक, ऐतिहासिक पुस्तके, आत्मचरित्रांचे वाचन तसेच लेखन आणि कविता करणारे, संवेदनशील मनाचे डॉ. निपुण विनायक यांनी मंगळवारी महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. त्यांच्या रूपाने बरोबर दोन महिन्यांनी पूर्णवेळ आयुक्त मिळाले. १५ मार्चला दीपक मुगळीकर यांची बदली झाल्यापासून हे पद रिक्त होते. 


यापूर्वी डॉ. निपुण यांनी जालना जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून, तर नांदेड महापालिकेचे आयुक्त म्हणूनही काम केले आहे. त्यामुळे त्यांना औरंगाबाद परिचित आहे. सायंकाळी सात वाजता डॉ. निपुण महापालिका मुख्यालयात आले. आयुक्त पदभार स्वीकारतात तेव्हा सर्व विभागप्रमुखांना बोलावण्यात येते. मात्र, डॉ. निपुण यांनी कोणालाही निरोप द्यायचा नाही, बुके नको, अशी सूचना स्वीय सहायक सुनील ढेकळे यांना केली होती. त्यामुळे एकाही अधिकाऱ्याला बोलावण्यात आले नव्हते. डॉ. निपुण हे दालनात आले. त्यांनी पदभार स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर सर्वसाधारण सभेच्या सभागृहाची पाहणी केली आणि मुख्यालय सोडले. सकाळी ८ वाजताच सर्व विभागप्रमुख तसेच वाॅर्डाधिकाऱ्यांची बैठक होणार असून त्यात शहर व मनपाची परिस्थिती जाणून घेतील. डॉ. निपुण यांच्याशी 'दिव्य मराठी'ने संपर्क साधला असता ते म्हणाले, मी उद्यापासून कामाला लागणार आहे. त्यामुळे महापालिकेविषयी ते बोलले नाहीत. परंतु फावल्या वेळेत वाचन, लिहायला आवडत असल्याचे सांगितले. २००५ पासून डॉ. निपुण हे नियमित ब्लॉग लिहितात. ब्लॉगवर त्यांनी स्वच्छता, अंधश्रद्धा, शहरांचा विकास, राजकारण आदींवर लिखाण केले आहे. त्यावर कविताही आहेत. 

 

पहिली भेट खा. खैरेंची 
डॉ. निपुण यांचे सायंकाळी विमानाने औरंगाबादेत आगमन झाले. शहरात पाय ठेवताच खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यामुळे खैरेंनी त्यांना काय टिप्स दिल्या हे समजू शकले नाही. 


डॉ. निपुण यांच्यासमोरील आव्हाने 
शहराची कचराकोंडी फोडणे. (त्यात निष्णात समजले जातात) पाणीपुरवठ्याचे नियोजन वाढीव पाणीपुरवठा योजना रुळावर आणणे मालमत्ता तसेच पाणीपट्टीच्या वसुलीत वाढ करणे  स्थानिक राजकारण्यांचा दबाव झुगारणे  शहागंज येथील फेरीवाल्यांचा प्रश्न मार्गी लावणे वाढती अतिक्रमणे. 

बातम्या आणखी आहेत...