महावितरणचे वीज बिल भरणा केंद्र सुटीच्या दिवशीही सुरू
औरंगाबाद- वीज ग्राहकांना वीज बिल भरणे सोयीचे व्हावे म्हणून सुटीच्या दिवशीही वीज बिल भरणा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. फेब्रुवारी महिन्यात १०, ११, १३, १८, १९, व २५ रोजी तसेच मार्च महिन्यात २, ४, १०, ११, १८, २४, २५, २९ व ३० रोजी सुटीच्या दिवशी महावितरणचे अधिकृत वीज बिल भरणा केंद्र कार्यालयीन वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहेत. वीज ग्राहकांना www.mahadiscom.in या संकेत स्थळावरही वीज बिलाचा भरणा करता येईल.