आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंगीचे औषध दिल्यावरही लक्ष्मीचा दोन तास कल्ला; सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील हत्तिणी विशाखापट्टणमला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सिद्धार्थ उद्यानातील सरस्वती आणि लक्ष्मी या दोन हत्तिणींना घेऊन जाण्यासाठी विशाखापट्टणम येथील इंदिरा गांधी झुलॉजिकल पार्कचे पथक शुक्रवारी रात्री शहरात आले होते. पथकाने शनिवारी दुपारपासून नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यात सरस्वतीला तासाभरात गाडीत बसवण्यात मनपाच्या काळजीवाहकांना यश आले, मात्र तरण्या लक्ष्मीला गुंगीचे इंजेक्शन देऊनही फायदा झाला नाही. तब्बल दोन तास काळजीवाहकांनी घाम गाळला तरी लक्ष्मी जाण्यासाठी तयार नसल्याने ती गाडीत बसली नाही. त्यामुळे सरस्वतीलाही रात्री उतरवून घेण्यात आले. 


प्राणिसंग्रहालयात गेल्या २० वर्षांपासून सरस्वती आणि लक्ष्मीसह शंकर हा मराठवाड्यासाठी आकर्षण होते. मात्र १९९८ ला शंकरचा मृत्यू झाल्यानंतर या दोनच मायलेकी प्राणिसंग्रहालयातील एक विशेष आकर्षण बनल्या होत्या. मात्र केंद्रीय झू अथॉरिटीच्या आदेशानुसार यांना हलवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. त्यानुसार शुक्रवारी रात्रीच इंदिरा गांधी झुलॉजिकल पार्क विशापट्टणमहून सहा जणांचे पथक शहरात दाखल झाले होते. 


शनिवारी सांयकाळी साडेपाच वाजता हत्तिणींना गाडीत टाकण्यासाठी सुरुवात झाली. तासाभरात सरस्वती गाडीत बसली होती, मात्र लक्ष्मीने मनपासह विशाखापट्टणमच्या काळजीवाहकांना हैराण करून सोडले. कर्मचाऱ्यांनी तारेवरची कसरत करूनही लक्ष्मीने गाडीत पाय ठेवला नव्हता. रात्री साडेआठ वाजता सरस्वतीला गाडीतून उतरवून घेण्यात आले. रविवारी सकाळी पुन्हा नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पथकात दोन प्रशिक्षक अथवा माहूत असत तर अडचण कमी झाली असती. तसेच चार दिवस अगाेदरच तेथील माहूत आले असते तर हत्तिणींना नेण्यास मदत झाली असती, असे प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी सांगितले. 


१९९६ मध्ये आणले होते शंकर-सरस्वती
सिद्धार्थउद्यानातील प्राणिसंग्रहालयात १९९६ मध्ये सरस्वती आणि शंकर या जोडीला आणले होते. लक्ष्मी १९९७ ला जन्मली. त्यानंतर १९९८ ला शंकरचा मृत्यू झाला. तेव्हापासून या दोघी प्राणिसंग्रहालयात होत्या. त्यांना आवश्यक जागा नव्हती. जोडीदार नर हत्ती नव्हता. तसेच साखळदंडात बांधून ठेवत असल्याने त्यांना घेऊन जाण्यात येणार आहे. 


लक्ष्मी होती डोकेदुखी 
शंकरगेल्यापासून सरस्वतीने काही त्रास दिला नाही. तसेच लक्ष्मी १७ वर्षांची होईपर्यंत कुणाला काही त्रास झाला नाही. मात्र १७ वर्षांनंतर ती वयात आल्यामुळे त्रास द्यायला लागली होती. दोनदा तिने कर्मचाऱ्यांवर हल्लाही केला होता. आज गाडीत टाकण्यासाठी गुंगीचे इंजेक्शन देऊनहीे ती गाडीत बसली नाही. उलट जोरजोरात आवाज करत ओरडत होती. 

बातम्या आणखी आहेत...