आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्रजी शाळांतील शिक्षकांसह विद्यार्थ्यांचेही इंग्रजीच कच्चे! काळ, नाम, क्रिया, लिंगात चुकांचा भडिमार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्मक फोटो - Divya Marathi
प्रतिकात्मक फोटो

औरंगाबाद- गल्लीबोळांमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटले असताना औरंगाबादेतील मुलांना इंग्रजी धड बोलता किंवा लििहता येत नाही. 


त्यांच्या उच्चारांवर मातृभाषा, स्थानिक भाषेचा प्रचंड पगडा आहे. तर काळ, नाम, क्रिया आणि  लिंगात चुकांचा भडिमार आहे. त्याचे कारण म्हणजे  शिक्षकच अप्रशिक्षित आहेत. त्यांनी इंग्रजी अध्यापनाचे औपचारिक प्रशिक्षण घेतलेले नाही. इंग्रजीच्या अभ्यासक डॉ. अस्मिता साळवे यांनी त्यांच्या पीएचडीसाठी केलेल्या शहरव्यापी सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे.


२६ शाळांत केला अभ्यास
डॉ. साळवे यांच्या "एरर अनाॅलिसिस ऑफ स्पोकन अँड रिटन इंग्लिश अॅट मिडल स्कूल अँड हायस्कूल लेव्हल अॅट औरंगाबाद सिटी' या संशोधनाला प्रा.डॉ. सदाशिव पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांत शिकणाऱ्या मुलांचे इंग्रजी नेमके कसे आहे? ते कोणत्या चुका करतात, चुकांची कारणे काय? हे त्यांनी प्रत्यक्ष मुलाखती आणि सर्वेक्षणातून अभ्यासले. त्यासाठी त्यांनी  इंग्रजी माध्यमातील २६ शाळांमधील ४०० विद्यार्थ्यांशी संपर्क साधला. यात माध्यमिकसाठी ७ वी तर हायस्कूलसाठी ९ वीच्या प्रत्येकी २०० विद्यार्थ्यांची लेखी आणि मौखिक चाचणी घेतली.  त्यानंतर त्यांनी निष्कर्ष नोंदवले आहेत. इंग्रजी जागतिक भाषा आहे. ती अस्खलित बोलता, लिहिता आली तरच त्याचा फायदा, असे त्यांचे म्हणणे आहे. 


निष्कर्ष शिक्षकांशी संबंधित
- इंग्रजी माध्यमातील शाळांतही इंग्रजीच्या शिक्षकांचे भाषाविषयक ज्ञान तोकडे आहे.
- ७५ %शिक्षिकांनी इंग्रजी शिकवण्याचे अौपचारिक प्रशिक्षण घेतलेले नाही.
- अनेक इंग्रजीच्या शिक्षकांकडे इंग्रजी शिकवण्यासाठी आवश्यक पात्रता नाही.
- ७५ % शिक्षकांचे मुलांच्या इंग्रजी व्याकरणाकडे लक्ष नाही. 
- शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा बोजाच अधिक आहे. त्यात इंग्रजीचे तास कमी असल्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्याकडेच शिक्षकांचा कल असतो.
- ५० % शाळात ग्रंथालय नाही. जिथे आहेत तेथे कामाची पुस्तके नाहीत.


या चुका सर्वाधिक
- अॅन  (an) व अ (a)चा गरज नसताना वापर.
- दोन वाक्ये जोडणाऱ्या कन्झक्शनचा चुकीच्या ठिकाणी वापर करतात.
- अॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हाइसमध्ये चुकाच चुका
- इज, आर, वॉज, विल, कूड, डीड यासारख्या काळांमध्ये घोळात घोळ


मौखिक चाचणीही धक्कादायक
मौखिक चाचणीसाठी प्रत्येक मुलाला १०० शब्द आणि ८ वाक्ये वाचण्यास सांगितली. त्याचे निष्कर्ष असे... 
- इंग्रजीवर मातृभाषा, स्थानिक भाषेचा, उच्चाराचा प्रभाव आहे.
- टेन्स, व्हर्ब, आर्टिकल, प्रेपोझिशन यात सर्वाधिक चुका
- मुले मराठीत विचार करतात आणि तसेच्या तसे इंग्रजीत भाषांतर करतात. यामुळे चुका वाढतात.
- शिक्षक इंग्रजीतील फ्लुअन्सी आणि व्याकरणातील समतोल साधण्याचा प्रयत्न करतात. पण तसे करताना एकही पक्के होत नाही.
- पालकांनी तक्रार करताच शिक्षक इंग्रजी संभाषणाच्या क्लासमध्ये जाण्याचा सल्ला देतात.
- मुले चुकीचे वाचत असतानाही शिक्षक त्यांना थांबवत नाहीत.
- कोणत्या शब्दावर जोर द्यायचा, शब्द स्वरात उच्चारायचा याबाबत शिक्षक मार्गदर्शन करत नाहीत.
- मुलांना प्रश्न समजतो, पण त्याचे उत्तर मातृभाषेत येते. चुकण्याच्या भीतीमुळे ते उत्तर देत नाहीत

बातम्या आणखी आहेत...