आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विहिरीत उडी घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या; बोंडअळी पडल्याने मोठे आर्थिक नुकसान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोड- सततची नापिकी व कपाशीवर बोंडअळी पडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याने नांदर (ता. पैठण) येथील तरुण शेतकऱ्याने सोमवारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ज्ञानेश्वर गणपत व्यवहारे (३३) असे त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. 


ज्ञानेश्वर गणपत व्यवहारे यांची नांदर शिवारात गट नंबर ३९८/१० दोन एकर शेती असून मोलमजुरी व घरच्या शेतीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. सर्व दोन एकर जमिनीवर उसनवारी करून कपाशीची लागवड केली होती, परंतु बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने येणाऱ्या उत्पन्नात घट झाल्याने त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केली. 


नांदर येथील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्ञानेश्वर व्यवहारे यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी, भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. 
ज्ञानेश्वर व्यवहारे 


मृतदेह पाहिला.. 
रविवारी (ता. २१) सकाळी शेतात चाललो म्हणून घरातून गेलेल्या ज्ञानेश्वर व्यवहारे घरी परत न आल्याने घरच्यांनी शोधाशोध केली. सोमवारी शेख निजाम यांच्या शेतातील विहिरीत मृतदेह तरंगत असल्याचे शेख निजाम यांनी पाहिले. त्यांनी याबाबत ग्रामस्थांना माहिती दिली. पाचोड पोलिस ठाण्याचे बीट जमादार गीताराम मते, शिवानंद बनगे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करुन शवविच्छेदन करण्यात आले. घटनास्थळी पाचोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...