आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोणी खुर्द (वैजापूर)- वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द परिसरातील अनेक ट्रान्सफॉर्मर महावितरण कंपनीने आठ दिवसापूर्वी बंद केले होते. बिल भरले नसल्याचे कारण पुढे करून शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. या भागात मोठ्या प्रमाणावर कांदा पीक आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने पिकाचे मोठे नुकसान होत असून पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. यामुळे शेतकरयात संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर साळुंके व संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी आक्रमक भूमिका घेत लोणी येथे उर्जा मंञी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुतळ्याला जोडे मारुन पुतळ्याचे दहन करुन सरकार विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला.

 

 

तालुक्यातील शेतकरी सद्य:स्थितीत रब्बी हंगामातील पिकांना वाचविण्यासाठी कृषी पंपाच्या साहाय्याने पिकांना पाणी देत आहेत; परंतु वारंवार खंडित होणारा शेतातील विद्युत पुरवठा शेतकर्‍यांच्या मुळावर उठला आहे. विद्युत पुरवठा सुरळीत राहत नसल्याने रब्बी पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. त्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात असून, शेतकरी हैराण झाले आहेत.
पावसाच्या हुलकावणीमुळे परिसरातील शेतकर्‍यांचा खरीप हंगाम हातचा निघून गेला. त्यामुळे खरिपातील कसर रब्बीत भरून काढण्याच्या तयारीत शेतकर्‍यांनी रब्बी पेरणी केली; परंतु ज्या शेतकर्‍यांकडे ओलिताची सोय आहे, त्यांनीच गहू, हरभरा आदी पिकांचा पेरा केला. गहू, हरभरा शेतात डोलत असतानाच त्याला पाणी देणे गरजेचे झाले आहे. तर तूर पिकही शेंगा पक्वतेच्या अवस्थेत असून, तूर पिकालाही पाण्याची अत्यंत गरज निर्माण झालेली आहे. त्यासाठी शेतकरी कृषी पंपाच्या साहाय्याने रब्बी पिकाला रात्रंदिवस पाणी देत आहेत; परंतु शेतातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पिकाला पाणी देणे अवघड झाले आहे. वेळीच पिकाला पाणी मिळाले नाही, तर ही पिके सुकण्याच्या वाटेवर आहेत. विद्युत सुरळीत राहत नसल्याने रब्बीला पाणीही मिळत नाही. त्यामुळे रब्बी हंगाम महावितरणच्या दुर्लक्षामुळे धोक्यात सापडत आहे. तर शेतातील विद्युत रोहित्र बिघडल्यास वीज वितरणचे कर्मचारीही कित्येक दिवस फिरकून पाहत नसल्याने शेतकर्‍यांना वीज वितरण कार्यालयाच्या पायर्‍या झिजवाव्या लागत आहेत. याकडे लक्ष देऊन शेतातील विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे. यावेळी युवा नेते आजय साळुंके तालुका अध्यक्ष संतोष निकम रामेशवर वाघ आण्णासाहेब काळे सचिन साळुंके भागवान शिनंदे दिपक ठोंबरे राहुल एरंडे दिलीप एरंडे.यांच्यासहा शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...