आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 वर्षीय तरुण शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्री- तालुक्याती लपिंपळगाव (गांगदेव) येथील एका तीसवर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणातून विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. ११) रोजी सकाळी घडली आहे. याबाबत फुलंब्री पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 


ज्ञानेश्वर नामदेव थोरात (३०, रा. पिंपळगाव गांगदेव, ता. फुलंब्री) असे विषारी औषध घेऊन आत्महत्या करणाऱ्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. ज्ञानेश्वर थोरात शंकर थोरात या दोन भावांमध्ये एकूण १७ आर जमीन आहे. या जमिनीवर २५ हजार रुपये एसबीआय बँकेचे कर्ज आहे, तर इतर खासगी देणे सुमारे एक लाख रुपयांपर्यंत कर्ज होते. या १७ आर मध्ये अल्प पावसामुळे नुकत्याच आलेल्या बोंडअळीमुळे क्विंटलभर कापसाचे उत्पन्न यात निघाले नाही. बँकेचे खासगी कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत ज्ञानेश्वर यांनी सोमवारी सकाळी दहा वाजता विषारी औषध सेवन केले. त्यास त्वरित फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी घाटी दवाखाना औरंगाबाद येथे दाखल केले असता उपचार सुरु असताना ११.४५ ला त्यांचे निधन झाले. 

बातम्या आणखी आहेत...