आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्री- मुलीच्या लग्नाची चिंता व सततच्या नापिकीमुळे तालुक्यातील वाघोळा येथील एका चाळीस वर्षीय शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. 


  ही घटना गुरुवारी (दि.२२) रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली. याबाबत फुलंब्री पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद केली. भीमराव गंगाधर गायकवाड वय ४० रा. वाघोळा ता. फुलंब्री असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.   भीमराव गायकवाड यांच्या नावे  गट नं.५३ मध्ये तीन एकर जमीन आहे. गेल्या तीन वर्षापासून सतत अत्यल्प पावसामुळे उत्पन्नावर झालेला खर्चही निघाला नाही.सेवा सोसायटीचे घेतलेले ऐंशी हजार रुपयेप्रमाणे इतर खासगी देण एक लाख तीस हजार आदी असे एकूण दोन लाख दहा हजार रुपयांचे कर्ज होते.


 हे कर्ज फेडायचे व वयात आलेल्या मुलीच्या लग्नासाठी पैसा कसा उभा करायचा, आदी  सर्व कारणांना कंटाळून त्यांनी गुरुवारी  रात्री अडीच वाजेच्या सुमारास आपल्या स्वतःच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या पश्चात पत्नी, आई, एक भाऊ, तीन मुली एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेचा पो.हे.कॉ. ए.एफ.आगळे यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला  आहे. 

बातम्या आणखी आहेत...