आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांचे आज आत्मदहन आंदोलन; आंदोलनाचे ठिकाण व वेळ गुप्त ठेवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- नागपूर अधिवेशनात ठरल्याप्रमाणे बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित भरपाई मिळावी, यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी १४ फेब्रुवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा सरकारला दिला आहे. आंदोलनाचे ठिकाण व वेळ गुप्त ठेवल्याने प्रशासनासह पोलिसांची कोंडी झाली आहे. आंदोलनाचे नेतृत्व करणारे माजी जि. प. सदस्य संतोष जाधव यांची समजूत घालून लोकशाही मार्गाने आंदोलन करावे, आंदोलनाचे ठिकाण व वेळ कळवावी, यासाठी सहायक पोलिस निरीक्षकांनी वजनापूर ग्रामपंचायत व जाधव यांना पत्र पाठवले आहे. 


आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना त्वरित भरपाई मिळावी, यासाठी काही शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा मार्ग निवडला आहे. बुधवारी हे आंदोलन होणार असून ते नेमके कुठे अन् कधी होणार याबाबत कोणालाच माहिती दिली नाही. मंत्रालयातील शेतकऱ्याच्या आत्महत्येचे उदाहरण ताजे असतानाच सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांची पंचाईत झाली आहे. अनुचित प्रकार कसा रोखावा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. 

बातम्या आणखी आहेत...