आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्चपासून रेल्वेस्थानकात मिळणार प्रथमोपचार सेवा; अॅम्ब्युलन्स सेवेचे पहिले स्थानक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- औरंगाबाद रेल्वेस्थानकावर मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून प्रवाशांसाठी प्रथमोपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. नांदेड विभागाचे रेल्वे व्यवस्थापक त्रिकालज्ञ राभा यांच्या पुढाकाराने धूत हॉस्पिटलच्या माध्यमातून ही सेवा दिली जाईल, तर भारतीय रेल्वे प्रवासी सेनेच्या वतीने अॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रथमच रेल्वेस्थानकावर २४ तास वैद्यकीय सेवा मिळणार अाहे. 


नांदेड रेल्वे विभागातून दररोज ७५ रेल्वे धावतात. गर्दीमुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. धावत्या रेल्वेतून पडल्यानंतर वेळेत प्रथमोपचार मिळत नाहीत. त्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. याकडे रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन प्रथमोपचार केंद्र सुरू करावेत, अशी मागणी रेल्वे प्रवासी सेना व प्रवाशांकडून करण्यात येत होती. याबाबत दिव्य मराठीने वृत्त प्रकाशित केले होते. तसेच रेल्वे प्रवासी सेनेने हा प्रश्न लावून धरला होता. त्याची नांदेड रेल्वे व्यवस्थापक राभा यांनी दखल घेतली असून मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात धूत हॉस्पिटलच्या मदतीने प्रथमोपचार केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेतून पडून जखमी होणारे प्रवासी, रुग्ण, गरोदर महिला आदींना त्वरित आरोग्य सेवा मिळणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...