आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीस नोकरीचे आमिष देऊन शहरात आणले; बळजबरीने करवून घेतला वेश्याव्यवसाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- छत्तीसगड येथून एका वीस वर्षीय तरुणीला शहरात आणून तिच्याकडून बळजबरीने वेश्याव्यवसाय करवून घेतला जात होता. पीडित तरुणीने गुरुवारी सकाळी पुंडलिकनगर येथील घराच्या खिडकीतून बाहेर उडी मारून रस्त्यावर येत आरडाओरड केल्याने हा प्रकार समोर अाला. नागरिकांनी आरोपी विलास उमणे (३८) याला चोप देत पोलिसांच्या हवाली केले. त्याच्याविरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
श्रुती (नाव बदललेले आहे) छत्तीसगडच्या बिलासपूरची रहिवासी आहे. काही वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले. ती आई व भावासोबत राहते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दिवाकर मेश्राम आणि त्याच्या पत्नीने श्रुतीच्या आईची भेट घेऊन औरंगाबादमध्ये तिला वीस ते पंचवीस हजारांची नोकरी देतो, अशी थाप मारली. कुटुंबाची परिस्थिती बेताचीच असल्याने श्रुतीच्या आईने तिला औरंगाबादला पाठवले. उमणेच्या ओळखीच्या महिलेने तिला नागपूरमार्गे १७ फेब्रुवारी रोजी शहरात आणले. ती शहरात पोहोचताच उमणेने तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. १७ ते २१ फेब्रुवारीदरम्यान दिवसभर घरात डांबून उमणेसह अनेकांनी तिच्यावर अत्याचार केला. श्रुतीच्या माहितीनुसार, या वेळी घरात काही महिलादेखील उपस्थित असायच्या. गुरुवारी सकाळी विलास व महिलांची नजर चुकवून ती खिडकीतून घराबाहेर पडली. हा प्रकार समजताच उमणे याने तिचा पाठलाग सुरू केला. तरुणीने मदतीसाठी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक धाऊन आले. त्यांनी उमणेला चोप दिला. पुंडलिकनगर ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी श्रुतीला ठाण्यात आणले. उमणेवर दुपारी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. 


पाच दिवस अत्याचार
उमणे श्रुतीवर अत्याचार करत असे. तसेच पाच दिवस तिला देहविक्रीसाठी शहरातील विविध लोकांकडे पाठवले. सुरुवातीला शेंद्रा येथील एका हॉटेलमध्ये नेले. येथे तिच्यावर चार जणांनी अत्याचार केला. त्यानंतर रेल्वेस्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. उमणे हा ग्राहकांकडून वीस ते पंचवीस हजार रुपये घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. उमणेवर पूर्वीही वेश्याव्यवसायाचे २ गुन्हे दाखल आहेत. 


सहापेक्षा अधिक आरोपी
या सर्व प्रकारांमध्ये श्रुतीने विरोध करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा उमणेसह ग्राहक म्हणून आलेल्यांनीसुद्धा तिला मारहाण केली. तिच्या फिर्यादीवरून उमणेसह दिवाकर मेश्राम, त्याची पत्नी आणि ज्यांनी ज्यांनी अत्याचार केले त्या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे निरीक्षक लक्ष्मीकांत शिंगारे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...