आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचे माजी नगरसेवक घडमोडेंना 50 हजार कॉस्ट, जनहित याचिकेचा हेतू साफ नसल्याचे निरीक्षण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सिल्लोड नगरपालिकेचे शिवसेनेचे माजी नगरसेवक रघुनाथ घडमोडे यांनी भोकरदन ते देऊळगाव राजा या राष्ट्रीय महामार्गासंबंधी दाखल केलेली जनहित याचिका खंडपीठाने खारीज केली. घडमोडे यांचा हेतू साफ नसल्याचे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. रवींद्र बोर्डे न्या. विभा कंकणवाडी यांनी पन्नास हजार रुपये कॉस्ट लावली आहे. सदर रक्कम लीगल अॅडमध्ये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. 


भोकरदन ते देऊळगाव राजा हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एम हा हसनाबाद, राजूर मार्गे नेण्यात आला आहे. या मार्गासाठी ४०६.५१ कोटी रुपये मंजूर केले आहेत. रस्ता बनवण्यासाठी एवढ्या निधीची गरज नसल्याचे घडमोडे यांनी म्हटले आहे. दुहेरी मार्गासाठी निधी दिला असून भोकरदनहून देऊळगावराजा येथे जाण्यासाठी दोन रस्ते असताना तिसऱ्या रस्त्याची गरज काय, असे याचिकेत नमूद केले होते. सहायक सरकारी वकील स्वप्निल जोशी यांनी योग्यता पडताळून मार्ग प्रस्तावित केल्याचे सांगितले. ही याचिका विनाकारण दाखल केल्याचे खंडपीठाने निरीक्षण नोंदवले. 

बातम्या आणखी आहेत...