आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात बोलावून घेत तलवारीने केला खून; शहरातील सिटी चौक परिसरातील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- घरात बोलवून तलवारीने हल्ला केलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी दुपारी चारच्या सुमारास सिटी चौक परिसरातील रोहिला गल्लीत हा प्रकार घडला. सय्यद अखिल हुसेन हमीद हुसेन (४५, रा. नूर कॉलनी) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी चारच्या सुमारास अखिल हे रोहिला गल्लीतील त्यांच्या मित्राकडे गेले होते. तेथे दोघांत वाद झाला आणि त्यांच्यावर तलवारीने वार करण्यात आले. इस्माईल याकूब यांनी त्यांना घाटीत दाखल केले. सव्वापाचच्या सुमारास त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अखिल यांच्या परिवाराचे सिटी चौक परिसरात ऑप्टिकलचे दुकान आहे. त्यांना दोन मुले, दोन मुली असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. 


हल्लेखोर मित्रच 
ज्या व्यक्तीने अखिल यांच्यावर हल्ला केला तो त्यांचा जवळचा मित्र असल्याची चर्चा या भागात होती. घटनेची माहिती मिळताच सिटी चौक पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक जानकर, उपनिरीक्षक संजय बांगर यांनी घटनास्थळाची पाहणी करून तलवार जप्त केली. या प्रकरणात रात्री आठ वाजेपर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती. मारेकरी घटनास्थळावरून पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. रिक्षाचालक असल्याची प्राथमिक माहिती आहे. अखिल आणि मारेकऱ्यात नेमका कशाचा वाद होता, याचा तपास पोलिस करत आहेत. मारेकऱ्याच्या बहिणीनेच जखमी अखिल यांना उपचारासाठी घाटीत दाखल केल्याची चर्चा या भागात होती. सिटी चौक पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...