आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमध्ये घाटी रुग्णालयात स्फोटाची अफवा; रुग्ण, नातलगांची पळापळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- येथील  घाटी रुग्णालयातील येथे वॉर्ड क्रमांक 24 मध्ये दुपारी आॅक्सिजन सिलिंडर बदलताना आवाज झाला. या आवाजास स्फोट झाल्याचे समजून नातलगांनी रुग्णांना घेऊन पळ काढला. यामुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. या घटनेची माहिती मिळताच डॉक्टरांनी वॉर्डात धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.

 

एका रुग्णाच्या व्हेटिंलेटरचे आॅक्सिजन सिलिंडर बदलताना हा आवाज झाला. हा अावाज ऐकून एका नातेवाईकाने स्फोट होत असल्याच्या भितीने रुग्णाला घेऊन वॉर्डाबाहेर पळ काढला. हे पाहून इतर नातेवाईकांनीही रुग्णांना घेऊन वॉर्डाबाहेर धाव घेतली. त्यामुळे एकच धावपळ सुरू झाली. याविषयी माहिती मिळताच डॉक्टर, सुरक्षारक्षकांनी या वॉर्डात धाव घेतली. स्फोट झाला नसल्याचे त्यांनी नातलगांना सांगितले. त्यानंतर रुग्ण, नातेवाईक पुन्हा वॉर्डात दाखल झाले आहेत. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...