आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिन्नरला भरदिवसा घरफोडी, 10 तोळे सोन्यावर मारला डल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर- भरदिवसा फ्लॅटच्या आतमध्ये प्रवेश करून लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून चोरट्याने १० तोळे सोने चोरून नेले. १६ ते १८ वर्षे वयाचा संशयित सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 


संजीवनीनगरातील इंद्रप्रस्थ अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर राहणारे वडांगळी विद्यालयातील उपशिक्षक काकासाहेब राजाराम तांबे यांच्या घरी ही चोरी झाली असून, अडीच लाखांवर मुद्देमाल चोरीला गेला आहे. तांबे यांच्या घरी यावेळी कोणीही नव्हते. पत्नी गोंदे येथे शेतीकामाला तर मुलगा दुपारी तीनला घराबाहेर निघून गेला होता. दुपारी पावणेचारला संशयित चोरटा जिना चढत असल्याचे दुसऱ्या मजल्यावर लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाले आहे. 


सहायक पोलिस उपनिरीक्षक रामदास धुमाळ, हवालदार समाधान सोळंके, राहुल निरगुडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. संशयिताचा चेहराही यात स्पष्टपणे दिसत असून पोिलस त्याच्या शोधात आहेत. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...