Home »Maharashtra »Marathwada »Aurangabad» Hailstorm And Rain Again In Marathwada And Vidarbha Live Updates

दुसऱ्या दिवशीही गारपीट, 2 जण ठार; राज्यात सव्वा लाख हेक्टरला फटका

दिव्य मराठी वेब टीम | Feb 13, 2018, 02:47 AM IST

औरंगाबाद-मराठवाडा-विदर्भात काही भागांना सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसला. मराठवाड्यात सोमवारी हिंगोली, परभणी आणि नांदेड हे तीन जिल्हे, तर विदर्भातील यवतमाळ, अमरावती जिल्ह्यात गारपीट झाली. नांदेडमध्ये लिंबगाव परिसरात जोरदार गारपीट व इतर तालुक्यांत पावसाने हजेरी लावली.

परभणी जिल्ह्यातील पूर्णा, जिंतूर, सेलू तालुक्यात साेमवारी गारपीट झाली. चुडावा येथे पत्र्याच्या शेडखाली थांबलेल्या भागीरथीबाई कांबळे (३५) यांचा शेड अंगावर पडून मृत्यू झाला. हिंगोलीतील कळमनुरी, वसमत तालुक्यात पाऊस, आखाडा बाळापूर भागात गारपीट झाली. साेलापूर जिल्ह्यातील बावकरवाडी येथे ऊसतोड कामगाराचा वीज पडून मृत्यू झाला.

आजही पावसाची शक्यता
मंगळवारी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. अमरावती, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत गारपीट होण्याची शक्यता आहे. तर अकोला, बुलडाणा आणि चंद्रपूर जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मराठवाडा क्षेत्रात हलक्या सरी पडू शकतात.

राज्यात ११ जिल्ह्यांत फटका, मराठवाड्यातील ४६,४७४ हेक्टरवरील पिके उद््ध्वस्त

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल सरकारला मिळाला आहे. ११ जिल्ह्यांत सुमारे १०८६ गावांतील एकूण १ लाख २४ हजार २९४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. मराठवाड्यात जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर आणि उस्मानबाद या सहा जिल्ह्यांना फटका बसला. मराठवाड्यातील ४६४ गावांचे ४६,४७४ हेक्टर (१ लाख १६ हजार १८५ एकर) क्षेत्राचे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

विमा नसेल तर निम्मीच भरपाई

पीक विमा असलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून भरपाई, तर विमा नसलेल्या शेतकऱ्यांना सरकार एनडीअारएफमधून मदत देईल. पीक विमा नसलेल्या शेतकऱ्याला विमाधारकांपेक्षा भरपाईपोटी ५०% कमी रक्कम मिळेल. म्हणजेच एखाद्या शेतकऱ्याला विमा कंपनीने भरपाईपोटी १० हजार दिले, तर त्याच पिकासाठी विमा नसलेल्या पिकांना सरकारकडून ५००० रुपये भरपाई मिळेल, असे अशी माहिती सूत्रांनी दिली.

पुढील स्लाईडवर विमा संरक्षणआणि आणखी फोटो...

Next Article

Recommended