आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदूंनो, तुम्ही संघटित राहा, शिवसेना तुमच्यासोबत आहे; आमदार इम्तियाज यांच्या अटकेची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहागंज येथील १० मेच्या दंगलीत हिंदूंवर दगडफेक करण्यात आली. आम्ही संरक्षणासाठी रस्त्यावर उतरलो होतो. सर्व हिंदूनी संघटित राहावे, शिवसेना पाठीशी आहे, असे सांगतानाच ज्यांचे या दंगलीत नुकसान झाले त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोर्चाला संबोधित करताना सांगितले. 


पोलिसांना विरोध करण्यासाठी काढलेला मोर्चा विभागीय आयुक्तालयावर जाणार होता. परंतु पैठण गेट येथून निघालेला हा मोर्चा मोठ्या फौजफाट्यासह पोलिसांनी श्रीमान श्रीमती येथेच अडवला. परंतु मोर्चेकरी थांबले नाहीत. त्यांनी तेथूनच वळण घेत सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या मैदानावर कूच केली. तेथे अनेकांची भाषणे झाली. तेथे बोलताना खैरे यांनी दंगलीच्या आरोपाखाली अटक असलेला राजेंद्र जंजाळ, लच्छू पहिलवान याला जास्त दिवस आत राहू दिले जाणार नाही. आम्ही त्यांना तातडीने सोडवू आणि नागरिकांच्याही पाठीशी असेच उभे राहू, असे खैरे म्हणाले. 


या मोर्चासाठी जितेंद्र महाराज, प्रकाश महाराज बोधलेही आले होते. इम्तियाज जलील यांनीच ठरवून ही दंगल घडवली असून त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी जितेंद्र महाराज यांनी केली. 


पोलिस काहीही म्हणतील... 
पैठण गेट येथे फक्त जमाव जमला होता. त्याला आम्ही सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या मैदानावर नेले, असा दावा पोलिस करत असले तरी हा मोर्चाच होता. पोलिसांनी तो अडवल्याने मैदानावर त्याचा समारोप झाला. त्यानंतर विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले, असे शिवसेनेने स्पष्ट केले आहे. अल्प मुदत दिल्यानंतरही ८ हजारांपेक्षा जास्त जमाव या मोर्चात सहभागी झाला होता, असा दावा खा. खैरे यांनी केला. 

बातम्या आणखी आहेत...