आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासकामांसाठी आमदारांचे उपोषण, चार तासांतच सोडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड- कन्नड-सोयगाव मतदारसंघातील विकास कामांसाठी आमदार हर्षवर्धन  जाधव यांनी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विभागाविरोधात उपोषणाचे हत्यार उपसताच बांधकाम मंत्र्यांनी तत्काळ दखल घेऊन अधिकाऱ्यांना लेखी आदेश देऊन सर्वच विकासकामे तत्परतेने सुरू करण्याचे आदेश दिले. त्यामुळे सकाळी दहा वाजता सुरू झालेले उपोषण दुपारी एक वाजता म्हणजेच चार तासातच सोडण्यात आले.   


कन्नड - सोयगाव मतदारसंघातील रस्त्यांबाबत आमदार हर्षवर्धन जाधवांनी विधानसभेत, विधानसभेच्या बाहेर आवाज उठवला,  प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातदेखील मोठी चर्चा झाली. मात्र बांधकाम विभाग काही धजेना. अखेर आ.जाधवांना उपोषणाचे हत्यार उपसावे लागले. मात्र उपोषणाच्या हत्याराने बांधकाम मंत्र्यांनीच दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन सर्वच प्रस्तावित कामांना मंजुरी देण्याचे फर्मान सोडले आणि कन्नड तालुक्यातील रस्त्यांचा श्वास मोकळा होण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात झाली.  याबाबत बांधकाम मंत्र्यांनी  प्रकरण अधिक चिघळून नव्या वादाला तोंड फुटू नये याची काळजी घेत चंद्रकांत पाटील यांनी सर्वच कामांच्या प्रस्तावाला मंजुरी देत मार्चमध्ये ती सुरू करण्याचे लेखी आदेश संबंधित विभागाला दिले आहेत.  


या वेळी सभापती राजेंद्र मगर, किशोर पवार, जयेश बोरसे, नगरसेवक अय्याज शहा, गणेश पाटील, अनिल आल्हाड आदी  उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...