आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IAS टॉपर टीना डाबी औरंगाबादेत, वेरूळ लेणीला दिली भेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - प्रसिद्ध आयएएस ऑफीसर टीना डाबीने नुकतीच औरंगाबादला भेट दिली. काल सोमवारी तिने वेरुळ लेणी तसेच इंडो-जर्मन तंत्रज्ञान केंद्राला भेट देऊन तेथील तंत्रज्ञानाविषयी माहिती जाणून घेतली. या भेटीचे फोटो तिने आपल्‍या इन्‍स्‍टाग्राम अंकाऊटवर पोस्‍ट केले आहेत. भेटीनंतर औरंगाबादेतील इंडोजर्मन केंद्र हे देशातील सर्वोत्‍तम केंद्रांपैकी एक असल्‍याचे टीनाने म्‍हटले आहे. आयएएस अधिकारी बनल्‍यानंतर टीना प्रथमच महाराष्‍ट्रात आली असून याबद्दल इन्‍स्‍टाग्रामवर अंकाऊटवर अनेकांनी तिचे स्‍वागत केले आहे. 

 

कोण आहे टीना डाबी?
टीना डाबी ही 2015ची युपीएससी टॉपर आहे. तिचा एप्रिल, 2018मध्‍ये आमिर उल शफी खान या आयएएस अधिका-याशी विवाह झाला. विशेष म्‍हणजे 2015च्‍या युपीएससी परिक्षेत आमिर टीनानंतर दुस-या क्रमाकांवर होता. दोघांचीही प्रशिक्षणादरम्‍यान भेट झाली होती. पहिल्‍याच भेटीत त्‍यांचे एकमेकांवर प्रेम जडले होते व त्‍यांनी विवाहाचा निर्णय घेतला होता.  टीना डाबीचे सध्‍या राजस्‍थानातील अजमेर येथे पोस्‍टींग करण्‍यात आली आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...  

 

 

 

बातम्या आणखी आहेत...