आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खासदार दानवेंना भेटलो तर म्हणे भाजपमध्ये चालला, दत्ता गोर्डे यांचे शक्तिप्रदर्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण - मी आमदारांविषयी केवळ घराणेशाहीचा विषय काढत आगामी विधानसभेसाठी उमेदवारी मागितली तर आमदाराने थेट वरिष्ठांची दिशाभूल करत माझी शिवसेनेतून हकालपट्टी करण्यास भाग पाडले. दम असेल तर या चौकात, असे आमदारांना उद्देशून म्हणत आगामी विधानसभा मी लढवणार अन् जिंकणारच कोण रोखतो ते पाहतो म्हणत नुकतीच शिवसेनेतून हकालपट्टी झालेले दत्ता गोर्डे यांनी पैठण शहरात आतषबाजी करत समर्थकांसह जोरदार शक्तिप्रदर्शन केले, तर एकाप्रकारे  आमदाराला जणू आवाहनच दिल्याचे चित्र मंगळवारी सकाळी शहरात दिसून आले. 


आमदार भुमरे यांनी स्वत:ची घराणेशाही टिकविण्यासाठी व मुलाला आमदार करण्यासाठी माझी शिवसेनेतून हकालपट्टी करण्यास वरिष्ठांना भाग पाडले. माझी हकालपट्टी  आता भुमरे यांंना कळेल त्यांची  किंमत काय आहे, मी शिवसैनिक आहे, कोण मला शिवसैनिक नाही, असे म्हणतो त्यांनी समोर यावे, असे खुले आवाहन दत्ता गोर्डे यांनी नगरसेवक प्रकाश वानोळे यांना दिले. तसेच  तुम्हाला तुमचे घरातील लोक निवडून आणता येत नाहीत ते माझ्यावर काय टीका करणार, असा सवाल करत आमदार भुमरे विरोधात विधानसभा लढणार, असे दत्ता गोर्डे यांनी जाहीर केले. भुमरे यांनी शिवाजी महाराज की जय ही घोषणा तरी म्हणून दाखवावी, असे खुले आवाहन करत जे आपल्या गावाचा विकास करू शकले नाही, ते आता तालुक्याचा विकास करतो अशा गप्पा मारत आहेत. शहरासह मी तालुक्यातील पाणीप्रश्नासाठी पुढाकार घेतला, त्या पाण्याविषयी साधा प्रस्ताव आमदाराला मंजूर करता आला नाही. भाजपचे रावसाहेब  दानवे  यांना पैठणच्या विकास निधीसाठी भेटलो तरी आमदार म्हणतात ते भाजपत जाणार आहेत.  मी शिवसेनेकडून तिकिटाची मागणी केली. लोकशाहीत तो अधिकार आहे. 

 

यांना विकास करता येत नाही, आला नाही ते आता दुसऱ्यांना विकासाच्या प्रश्नावर बोलू देत नाही  मी विकासाच्या मुद्द्यावर लढणार असल्याचे दत्ता गोर्डे यांनी स्पष्ट केले. मी  आजपर्यंत भुमरेंच्या पिंजऱ्यात बंद होतो, आता पिंजऱ्यातून बाहेर पडलो म्हणत दत्ता गोर्डे यांनी  आता प्रत्येक गावागावात सभा घेऊन विकासाचे प्रश्न घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरणार, असे स्पष्ट केले. या वेळी अनेक पक्षातील  कार्यकर्त्यांसह हजारो समर्थक शिवाजी चौकात उपस्थित होते. 

 

पक्षापेक्षा कुणीही मोठे नाही...
दत्ता गोर्डे यांना उमेदवारी मागण्याचा हक्क आहे, त्यांनी ती शिवसेनेकडुन मागायला हवी  होती,ते विधानसभेसाठी भाजपकडुन मी उमेदवार असणार आहे असे सांगत होते. हे पक्षा विरोधी कृत्य झाले असल्याने त्यांची पक्षातुन हकलपट्टी करण्यात आली आहे. यात त्यांना पक्षानी मोठे केले ते पक्षा पेक्षा स्वताला मोठे समजु लागले आहे. शिवसेना हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. दरम्यान आज गोर्डेंनी केलेल्या शक्तीप्रदर्शनात एकही शिवसैनिक नव्हता यावरून त्यांची किमत कळते.

- आमदार संदीपान भुमरे

 

आम्हाला निष्ठा शिकवू नका...
दत्ता गोर्डे यांनी आम्हाला निष्ठा शिकऊ नाही, ते शिवसैनिक नव्हते, शिवसेनेने त्यांना मोठे केले आता ते आम्हाला निष्ठा शिकवत आहे.  त्यांना आज समजले असेल त्यांची काय ताकत आहे एक ही शिवसैनिक त्यांच्या बरोबर नाही ही शक्तीप्रदर्शनातून दिसून आले. आम्ही शहरासह ग्रामीण भागात शिवसेना वाढीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्य करत आहोत. 
- प्रकाश वानोळे, शहराध्यक्ष शिवसेना पैठण

 

पुढील स्लाईडवर पहा, गोर्डे यांचे शक्तिप्रदर्शन 

बातम्या आणखी आहेत...