आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1068 विद्यार्थ्यांत 14 वर्षांची शालिनी एकटी दृष्टिहीन; पॅराअॅथलिटमध्ये जिंकली चार सुवर्णपदक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिकर- राजस्थानच्या सिकरची शालिनी चौधरी (१४) जन्मत: दृष्टिहीन आहे. तिला शिकायचे होते, परंतु सिकरमध्ये एकही विशेष शाळा नव्हती. तिने जिद्दीने १०६८ विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेत जिद्दीने प्रवेश घेतला. शाळेत ती एकमेव दृष्टिहीन होती. शाळेत ९० टक्के मुले. पण तिला बिलकुल खंत नाही. शालिनी म्हणते, मुला-मुलींमध्ये डोळे भेद करतात. मला तर दृष्टीच नाही...


१३ वर्षे वयोगटात राजस्थानमधील पहिली दृष्टिहीन विजेती...
पॅराअॅथलिटमध्ये शालिनीने सुवर्णपदक मिळवले. २०१६ मध्ये झालेल्या सातव्या पॅराअॅथलिट स्पर्धेत शालिनीने १०० मीटर, २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत, शॉर्ट पूट, रिलेमध्ये तीन सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकले आहे. २०१७ मध्ये उदयपूरमध्ये झालेल्या राजस्थान पॅराअॅथलिट स्पर्धेतही सुवर्ण आपल्या नावे केले. वयाच्या १३ व्या वर्षी टी-११ प्रकारात १५०० मीटरच्या धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करणारी शालिनी पहिली दृष्टिहीन विजेती आहे. शालिनी सध्या पॅरालिम्पिकची तयारी करत आहे. 

बातम्या आणखी आहेत...