Home »Maharashtra »Marathwada »Aurangabad» ACP Govardhan Kolekar Out Of Danger, He Injured During Aurangabad Violence

ACP कोळेकर शुद्धीवर..पहिला प्रश्न-'रात्रीची घटना शांत झाली काय? परोपकारीची प्रकृती कशी?'

शहरातील मोती कारंजा, शहगंज तसेच राजाबाजारात उसळलेल्या शुक्रवारी (11 मे) रात्री उसळलेल्या दंगलीत कायदा आणि सुव्यवस्था राख

दिव्य मराठी वेब टीम | May 16, 2018, 18:10 PM IST

औरंगाबाद/मुंबई- शहरातील मोती कारंजा, शहगंज तसेच राजाबाजारात उसळलेल्या शुक्रवारी (11 मे) रात्री उसळलेल्या दंगलीत कायदा आणि सुव्यवस्था राखताना गंभीर जखमी झालेले सहायक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर हे दोन दिवसांच्या उपचारानंतर शुद्धीवर आले आहेत.

सोमवारी (14 मे) त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. विशेष म्हणजे शुद्धीवर येताच त्यांनी रात्रीची घटना शांत झाली काय? परोपकारीची प्रकृती कशी आहे, असे कागदावर लिहून विचारले.

पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी हे देखील दगडफेकीत जखमी झाले होते. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. कोळेकर यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या स्वरयंत्राला गंभीर दुखापत झाली असून ते वाचवण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, औरंगाबाद शहरातील दंगलीच्या दोन दिवसांनंतर सोमवारी राजाबाजार आणि नवाबपुऱ्यातील वातावरण हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव शहराच्या संवेदनशील भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्‍यात आला आहे.

शुक्रवारी रात्री हल्लेखोरांच्या दगडफेकीत गंभीर जखमी झालेले सहायक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. कोळेकर दोन दिवस बेशुद्ध होते. त्यांच्या स्वरयंत्राला जबर दुखापत झाली आहे. शहरातील सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारासाठी त्यांना सोमवारी सकाळी एअर अॅम्ब्युलन्सने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. दगडफेकीत जखमी झालेले सहायक पोलिस आयुक्त रामेश्वर थोरात, निरीक्षक हेमंत कदम, श्रीपाद परोपकारी व इतर कर्मचाऱ्यांवर औरंगाबादेत उपचार सुरू आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...संबंधित फोटो...

Next Article

Recommended