आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Aurangabad Violence..चौकशीसाठी IPS अधिकाऱ्यांची समिती, 72 तासांत मिळणार नवे पोलिस आयुक्त Aurangabad Violence Issue Investigation For IPS Officer

आैरंगाबाद दंगलीतील पोलिसांची भूमिका तपासणार: मुख्यमंत्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आैरंगाबाद शहरात १२ मे रोजी मध्यरात्री उसळलेल्या जातीय हिंसाचारप्रकरणी अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक बिपिन बिहारी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली जाईल. त्यामार्फत या हिंसाचारात पोलिसांची नेमकी काय भूमिका होती आणि राजकीय हेतूने ही दंगल कोणी घडवली याची चौकशी केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुस्लिम आमदारांच्या शिष्टमंडळास दिले.  मंगळवारी सकाळी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली होती.

 

तेव्हा मुख्यमंत्र्यांनी वेळ नाकारली होती. त्यानंतर या शिष्टमंडळाने मंत्रालयाच्या पायऱ्यांवर धरणे धरले. त्यानंतर तातडीने रात्री साडेअकरा वाजताची वेळ देण्यात आली. त्यावर  शिष्टमंडळाने ‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. औरंगाबाद हिंसाचारात पोलिसांनी बघ्याची भूमिका कशी घेतली, तसेच शिवसेनेचे नेते कशा पद्धतीने हिंसाचारास चिथावणी देत होते, त्याबाबतचे व्हिडिओ फुटेज आमदारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केले.   या शिष्टमंडळात अब्दुल सत्तार (सिल्लोड-सोयगाव, काँग्रेस), आसिफ शेख (मालेगाव, काँग्रेस), इम्तियाज जलील (औरंगाबाद मध्य, एमआयएम), वारिस पठाण  (भायखळा, एमआयएम), अबू असीम आझमी (शिवाजीनगर-मानखुर्द, सपा) आणि अमीन पटेल (मुंबादेवी, काँग्रेस) या आमदारांचा समावेश होता.  

बातम्या आणखी आहेत...