आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • कचऱ्याच्या गाड्यांसाठी 850 पोलिस येतात, दंगलीच्या वेळी का नाही?, चंद्रकांत खैरे यांचा सवाल Aurangabad Violence MP Chandrakant Khaire Attack On Maharashtra Police

कचऱ्याच्या गाड्यांसाठी 850 पोलिस येतात, दंगलीच्या वेळी का नाही?, चंद्रकांत खैरे यांचा सवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दंगलीत पोलिसांना आम्हीच संरक्षण दिले. आता सरकारच्या दबावाखाली पोलिस आमच्यावर गुन्हे दाखल करत आहेत. त्यामागे पोलिसांतील अंतर्गत वादही आहे. दंगलीचा निषेध करण्याबरोबरच पोलिसांची चौकशी करावी, या मागणीसाठी शिवसेनेना शनिवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर हिंदू शक्ती मोर्चा काढणार आहे. पूर्वीप्रमाणे रस्त्यावर येऊन शिवसेना काय चीज आहे हे दाखवून देऊ, असा इशारा शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिला. 


गुरूवारी पत्रकारांशी बोलताना खैरे म्हणाले की, शहरातील वातावरण पाहता पोलिस परवानगी देण्याची शक्यता कमीच आहे. त्यांनी परवानगी दिली नाही तरी विनापरवागी मोर्चा काढण्याची आमची तयारी आहे. यावेळी संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, सहसंपर्कप्रमुख अण्णासाहेब माने, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर आदी उपस्थित होते. हा मोर्चा विराट असेल आणि त्याचा मार्ग पैठण गेट, सिटी चौक, शहागंज, चेलीपुरा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा असेल, असे खैरे म्हणाले. 


दंगल पोलिसांनीच घडवली : दानवे 
आयुक्त शहरात नाहीत. दोन उपायुक्त रजेवर आहेत. गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदावरून अधिकाऱ्यांत वाद आहे. या राजकारणातून रॉकेलमाफिया व पत्ते क्लब चालवणाऱ्यांच्या मदतीने ही दंगल पोलिसांनी घडवली. शहरात एसआरपी असताना जालन्याहून मागवली. क्यूआरटी का आली नाही? मुस्लिम तरुण दंगल करताना दिसू नये म्हणून त्यांनीच सीसीटीव्हीचे फुटेज गायब केल्याचा थेट आरोप जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केला. 


३५० प्लास्टिक गोळ्या कोठे गेल्या?
दंगल शमवण्यासाठी ३५० प्लास्टिक गोळ्या वापरल्याचा पोलिसांचा दावा आहे. या प्लास्टिकच्या गोळ्या कोणाला दिसल्या नाहीत. ३५० गोळ्या किमान १० जणांना तरी लागल्या असतील. एक तरुण वगळता त्या कोणालाही लागल्याचे दिसून येत नाही. या गोळ्या गेल्या कोठे, असा सवाल संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी केला. 


...तर दंगल झालीच नसती 
मुस्लिमबहुल भागात काँग्रेसचे वर्चस्व वाढत असल्याने एमआयएम अस्वस्थ होती. त्यामुळे त्यांनी ही दंगल घडवली. आम्ही कल्पना देऊनही पोलिसांनी दुर्लक्ष केले. पोलिसांनी हस्तक्षेप केला असता तर दंगल झालीच नसती. मिटमिट्यात कचरा टाकण्यासाठी १५० अधिकारी आणि ७०० पोलिस तैनात होते. येथे दंगल सुरू असताना पोलिस बळ पुरवले नाही. पोलिसांना वाचवणाऱ्या राजेंद्र जंजाळ यांना लगेच अटक झाली, परंतु मतीन कोठे पळून गेला, असे खैरे म्हणाले. 

 

पुढील स्लाइड्‍सवर वाचा... 350 प्लास्टिक गोळ्या कोठे गेल्या?

बातम्या आणखी आहेत...