आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राँग नंबरवर झाली ओळखी..लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, गळ्यात खोटे मंगळसुत्रही घातले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- राँग नंबरवर झालेल्या औळखीचा फायदा घेत एकाने 23 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना 30 जून 2017 ते 21 जानेवारी 2018 या दरम्यान घडली. आरोपी अमोल शिवाजी सोनटक्के (वय-28, रा.भोईवाडा) याच्या विरोधात सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.


काय आहे हे प्रकरण?
पीडित तरुणी आणि अमोल सोनटक्के याची राँग नंबरवर ओळख झाली होती. ओळखीचा गैरफायदा घेत सोनटक्के याने पीडितेस लग्नाचे आमिष दाखविले. तसेच तिच्यासोबत खोटे लग्न करून तिच्या गळ्यात बेन्टेंक्सचे मंगळसूत्र घातले. त्यानंतर दोघेही पती-पत्नीप्रमाणे राहु लागले. या काळात अमोल सोनटक्के याने पीडितेसोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नंतर तरुणीने नातेवाईकासमोर त्याला लग्न करण्याचा आग्रह धरला असता. त्याने पीडितेला   अनेकदा मारहाणही केली. अधिकृतरित्या लग्न कर असा तगादा लावल्यावर त्याने लग्न करण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर पीडित तरुणीने अमोल सोनटक्केविरूद्ध सिटीचौक पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक निरीक्षक जानकर करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...