आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेस जाळून मारल्याप्रकरणी पतीस जन्मठेप; दारू पिण्यासाठी मागायचा पैसे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विवाहितेस जाळून मारल्याप्रकरणी सासू, सासरे, दीर आणि नणंदेची निर्दोष मुक्तता करून पतीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. धुळ्याच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच जणांना आठ वर्षांची सक्तमजुरी सुनावली होती. याविरोधात शासनाने खंडपीठात अपील केले असता, मुंबई हाय कोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. सुनील देशमुख व न्या. संगीतराव पाटील यांनी पती काशीनाथ भटा धनगर (32, रा. मालपूर ता. सिंदखेडा, जि. धुळे) यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

 

काय आहे हे प्रकरण?
काशीनाथ भटा धनगर याच्याशी रेखाबाईचा 1993 मध्ये विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा व मुलगी आहेत. रेखाचा सासरा भटा श्रावण धनगर हा तिला शेळी मेंढी पालन व्यवसायासाठी पन्नास हजारांची मागणी करत होता तर पती दारू-पत्त्यासाठी माहेराहून पैसे आणण्यास सांगत होता. पती काशीनाथ, सासरा भटा धनगर, सासू जिजाबाई धनगर, दीर संजय धनगर आणि नणंद रेखा ऊर्फ चंद्रभागाबाई धनगर यांनी 21 नोव्हेंबर 2001  रोजी अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिल्याने तिचे दुसऱ्या दिवशी 22 नोव्हेंबर 2001 रोजी निधन झाले. आपणास पेटवून दिल्याची फिर्याद तिनेच रुग्णालयात असताना दिली होती. तिच्या जबाबावरून दोंडाईचा पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात प्रारंभी भादंवि कलम 307 व 498 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. रेखाच्या निधनानंतर भादंविचे कलम 302 दाखल करण्यात आले.

 

पुढील स्लाइड्‍सवर वाचा...दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा भोगावी लागेल....

 

बातम्या आणखी आहेत...