आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांना हत्येची धमकी: \'फडणवीस फॉर महाराष्ट्र\' फेसबुक पेजची चौकशी करा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सोशल मीडीयावर 'देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र' या नावाने चालणार्‍या 'फेसबुक पेज'ची सखोल चौकशी करण्‍याची मागी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीन पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

 

मागील दोन-तीन दिवसांपासून भीमा कोरेगाव जातीय दंगलीसंबंधी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बाबतीत आक्षेपाहार्य व बदनामी कारक मजकूर टाकून जातीय व सामाजिक भावना भडकवतील, अशा प्रकाच्या पोस्ट टाकण्यात आल्या आहेत. त्या संदर्भात या पेजची सखोल चौकशी करुन त्या मागच्या सूत्रधार कोण, या बाबतचा सायबर क्राईम अॅक्टनुसार संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, या मागण्याचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नवनाथ देवकते, अजहर पटेल,विश्वजीत बडे, शरद पाटील, अजय मरसाळे, चंद्रमुनी खिल्लारे, भागवत डुकरे, गणेश जाधव, सुमेध अवारे, ऋषीकेश टोटला, अंकुश जाधव, आकाश दिपके यांची उपस्थिती होती.

 

दरम्यान, भीमा कोरेगाव हिंसाचारात हिंदुत्त्ववादी संघटनांचा हात असल्याचा आरोप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दोन दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे शरद पवारांना 'फडणवीस फॉर महाराष्ट्र' या पेजवरून ही धमकी दिली आहे. तसेच भीमा कोरेगाव प्रकरणानंतर या पेजवरून पवारांविरोधात गरळ ओखणारे संदेश शेयर केले आहेत.

 

https://www.facebook.com/FadnavisforMaharashtra/ या फेसबुक पेजवर अवधूत प्रकाशराव शिंदे या व्यक्तीने ही कमेंट करताना धमकी दिली आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा...शरद पवार यांच्याबाबत आक्षेपाहार्य व बदनामीकारक मजकूर...

बातम्या आणखी आहेत...