आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेसारखा लाचार पक्ष कधी पाहिला नाही; राष्ट्रवादीच्या या आमदाराने केला 'हल्लाबोल'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण- सध्या राज्यात शिवसेनेसारखा लाचार पक्ष पाहिला मिळत नाही. रोज सरकारमधून बाहेर पडणार, शेवटचा इशारा एवढेच काम शिवसेनेकडे असून हा लाचार पक्ष सत्तेमधून बाहेर पडणार नाही. शिवसेना, भाजप सरकारला खाली खेचण्यासाठी व शेतकरी, सामान्यांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी शरद पवार यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे हल्लाबोल मोर्चा होत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी व्यक्त केले.

 

आमदार चिकटगावकर पैठण येथे या हल्लाबोल आंदोलनाच्या सांगता सभेच्या पूर्व तयारीसाठीच्या बैठकीत बोलत होते. या वेळी आमदार सतीश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना, माजी आमदार संजय वाघचौरे, रवींद्र शिसोदे, विजय गोरे, अनिल घोडके, भास्करराव राऊत, गोविंद शिंदे, अरुण काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. भाऊसाहेब चिकटगावकर म्हणाले की, यांनी मोदी व फडणवीस सरकार हे खोटे व फसवणूक करणारे सरकार आहे. या सरकारला आता जनता खाली खेचणार आहे. लोकांत प्रचंड चीड या सरकारवर आहे. 

 

आमदार सतीश चव्हाण यांनी मोदी सरकार हे नोटाबंदी करून स्वत: मात्र त्यांच्या लोकांकडे दोन हजारच्या नोटा कोठून आल्या, असा आरोप केला. या वेळी कदीर मौलाना यांनीही मार्गदर्शन केले. माजी आमदार संजय वाघचौरे यांनी या हल्लाबोल आंदोलनासाठी तालुक्यातील दीड हजार गाड्या जाणार असून प्रत्येक गावातून पाच गाड्यांचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले.  

या बैठकीसाठी गुलदादखाँ पठाण, ज्योती काकडे, बजरंग लिंबोरे, डॉ. विष्णू बाबर, कल्याण भुकेले, उमेश पंडुरे, रेवण कर्डिले, कौसर पटेल, भाऊसाहेब  तरमळे, मुस्तफा पठाण, विजय गायकवाड, शिवाजी घोडके, बाबासाहेब लांडगे, पंकज चव्हाण, दत्ता काळे, जितू परदेशी, विष्णुकांत मुंदडा, अनिल हजारे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...