Home | Business | Auto | New Hydrogen Powered Cycle Mileage 100km On 2 Litre Tank Of Hydrogen

बाईकच नाही तर कारपेक्षाही महागडी आहे ही सायकल, चालते विना पायडल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 22, 2018, 07:53 PM IST

जगामध्ये पहिली अशी सायकल लाँच झाली आहे, ज्यामध्ये पायडल मारण्याची आवश्यकता पहणार नाही.

 • New Hydrogen Powered Cycle Mileage 100km On 2 Litre Tank Of Hydrogen

  युटिलिटी डेस्क:- जगामध्ये पहिली अशी सायकल लाँच झाली आहे, ज्यामध्ये पायडल मारण्याची आवश्यकता पहणार नाही. एवढेच नाही तर ही पेट्रोल, डिझेल व बॅटरीवरही चालणार नाही. फ्रान्सची स्टार्ट-अप कंपनी प्राग्मा इंडस्ट्रिजने हायड्रोजन पावर्ड सायकलीला लाँच केले आहे. या सायकलीचे नाव अल्फा बाईक असे ठेवले आहे. ही पहिली अशी सायकल आहे जी हायड्रोजन गॅसवर चालणार आहे. कंपनीचा दावा आहे की, ही 2 लीटर हायड्रोजन गॅसवर 100 किलोमीटरचे दमदार मायलेज देणार आहे.

  बाईकच नाही तर कारपेक्षाही महागडी
  या सायकलीची किंमत 7,500 युरो म्हणजे जवळपास 6 लाख रुपये असेल. सध्या ही फ्रान्समध्ये लाँच केली आहे. कंपनीने सायकलीला नगरपालिका आणि कार्पोरेट सेक्टरसाठी बनवले आहे. कंपनीचे फाऊंडर आणि चिफ एक्झिकेटिव्ह पाएरे फोर्टे यांनी म्हटले की, अन्य कंपनीकडे हायड्रोजन बाईकचे प्रोटोटाईप आहे, मात्र आमच्या कंपनीने अशी बाईक सर्वात पहिले बनवून दाखवली आहे.

  1 लीटरमध्ये धावणार 50 किलोमीटर
  अल्फा बाईक हायड्रोजन गॅसवर चालणार आहे. कंपनीचा दावा आहेकी, 1 लिटरच्या गॅसमध्ये 50 किलोमीटरचे मायलेज देणार आहे. सायकलमधील गॅस संपला तर अशावेळेस तुम्ही पायडलचा वापर करु शकतात. प्राग्मा कंपनीने मागिल वर्षी 100 सायकल बनवल्या होत्या, तेथेच या वर्षी 150 सायकल बनवण्याची प्लॅंनीग करत आहे.

  पुढील स्लाइवडर वाचा, हायड्रोजन गॅसने चालणारी अल्फा बाईकचे फोटोज...

Trending