आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटीसाठी रात्रीची संसद, मग राममंदिरासाठी का नको? डॉ. प्रवीण तोगडिया यांचा सवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- जनतेने राममंदिराच्या उभारणीसाठी तुम्हाला मतदान केले आहे. न्यायालयाच्या निवाड्यानुसार मंदिराला कमी तर मशिदीला जास्त जागा मिळणार आहे. परंतु मंदिराच्या बाजूला आम्ही मशीद होऊ देणार नाही, असा इशारा देतानाच जीएसटीसाठी मोदी सरकार रात्रीची संसद बोलावते, मग राम मंदिरासाठी का नको, असा सवाल विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री डॉ. प्रवीण तोगडिया यांनी शुक्रवारी (दि.नऊ) येथे केला. संसदेत कायदा करूनच राम मंदिराची उभारणी करीत या सरकारने २०१९ मध्ये पुन्हा थेट दिल्लीत विराजमान व्हावे, असा सल्लाही तोगडिया यांनी पंतप्रधान मोदी यांना दिला. 


विश्व हिंदू परिषदेच्या देवगिरी प्रांताच्या वतीने दत्तनगरातील प्रल्हादराव कानडे पोहंडूळकर यांच्या निवासस्थानी आयोजित चहापान कार्यक्रमात डॉ.तोगडिया यांनी विचार मांडले. क्षेत्रमंत्री शंकर गायकर, प्रांताध्यक्ष अप्पासाहेब बारगजे, शिवाजी शेरकर, प्रांतमंत्री अनंत पांडे, सहमंत्री ललित चौधरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.  


डॉ.तोगडिया यांनी विश्व हिंदू परिषद गेल्या दहा वर्षांत राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, धर्मांतर रोखण्यासाठी परिषदेने केलेल्या प्रयत्नांमुळे ५० लाख लोक धर्मांतरीत होण्यापासून वाचले आहेत. ६० हजार गावांत परिषदेच्या वतीने मोफत शिक्षण व त्यातून धर्मसंस्कार करण्याचे काम सुरू आहे. विहिंपच्या हिंदू हेल्पलाईन अंतर्गत आरोग्य सेवेसाठी जोडल्या गेलेल्या डॉक्टरची संख्या एक लाखापर्यंत येत्या काही काळात पोहोचेल व त्यातून तीन ते चार कोटी गोरगरिबांवर खासगी रुग्णालयात मोफत उपचार दरवर्षी केले जातील.  यावेळी शहरातील विविध संघटनांच्या वतीने डॉ.तोगडिया यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा कार्याध्यक्ष प्रल्हादराव कानडे, ज सुरेंद्र शहाणे,  राजकुमार भांबरे,  सुनील रामपूरकर,  गोपाळ रोडे, माधव खुणे आदींनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी आ.डॉ.राहुल पाटील, भाजपचे आनंद भरोसे, नगरसेविका डॉ.विद्या पाटील, गट नेत्या मंगल मुद्गलकर, सुनील देशमुख, प्रशांत पार्डीकर, नगरसेवक अशोक डहाळे,  अनिल डहाळे आदी उपस्थित होते.   

 

 

मोदींना म्हणाले बडाभाई!

राम मंदिराच्या निर्मितीसाठी संसदेत कायदा करा 
आणि पुन्हा २०१९ च्या निवडणुकीत दिल्लीत सत्तेत विराजमान व्हा, असा सल्ला देताना डॉ.तोगडिया यांनी नरेंद्र मोदींचा उल्लेख बडाभाई असा केला. 

 

सोमनाथच्या धर्तीवर राममंदिर उभारू
राम मंदिराच्या प्रश्नावर बोलताना डॉ.तोगडिया म्हणाले, सरदार वल्लभभाई पटेलांनी सोमनाथच्या मंदिराची निर्मिती ज्या पद्धतीने केली त्या पद्धतीने राम मंदिर केलेच जाईल. राम मंदिराचा वाद न्यायालयीन प्रक्रियेतून सोडवण्याऐवजी  मोदी सरकारने विशेष संसद बोलावून या बाबतचा कायदाच पारीत करावा, असेही ते म्हणाले. 

 

तोगडियांसाठी 400 पोलिसांचा बंदोबस्त...

डॉ.प्रवीण तोगडिया हे दोन दिवसांसाठी श हरात मुक्कामी आहेत. झेड प्लस सुरक्षा  व्यवस्था असलेल्या  तोगडियांसाठी जम्बो पोलिस बंदोबस्त या काळात शहर आणि ग्रामीण भागात 400 पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

 

तोगडिया गुरुवारी विमानाने शहरात दाखल झाले. शुक्रवारी  परभणी येथे कार्यक्रमासाठी जाणार आहे. शनिवारी सकाळी घृष्‍णेश्वर, भद्रा मारुतीचे दर्शन घेतल्यानंतर ते शनिशिंगणापूरला जातील. त्यांच्या सुरक्षीततेसाठी दोन सहाय्यक पोलिस आयुक्त, 17 पोलिस निरीक्षक, तीन स्ट्रायकिंग फोर्स, वाहतूक विभाग व इतर असे 400 पोलिस तैनात आहेत.

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा... अहमदाबादेतून प्रवीण तोगडिया अचानक झाले होते बेपत्ता

बातम्या आणखी आहेत...