आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रातील सरकार दंगली घडवून अाणतेय: केजरीवाल यांचा भाजपवर आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंदखेडराजा- राजमाता जिजाऊंनी घडवलेले छत्रपती शिवाजी महाराज,  महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना तिलांजली देत महाराष्ट्रातील फडणवीस सरकारने राज्यातील शेतकरी तसेच सामान्य जनतेला दे माय धरणी ठाय करून साेडले अाहे. विकास करायचा साेडून हे सरकार जाती, धर्माच्या नावावर दंगली घडवत अाहे. अशा सरकारला सत्तेतून खेचण्यासाठी सर्व जनतेने एकत्र यावे, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी केले. 


जिजाऊ जन्मोत्सवाचे अाैचित्य साधून आम आदमी पक्षाच्या वतीने ‘महाराष्ट्र संकल्प’ सभा अायाेजित केली हाेती. या वेळी ते बाेलत हाेते.  


केजरीवाल म्हणाले, ‘शिक्षण, आरोग्य सेवा, वीजपुरवठा या समस्यांवर उपाय शाेधणे अावश्यक असताना महाराष्ट्रातील सरकार धर्म व जातींच्या नावाखाली दंगली घडवून आणत अाहे. अाम्ही दिल्लीत सरकारी शाळांचा दर्जा सुधारला, माेफत अाराेग्य सेवा दिली.  महाराष्ट्रातील सरकार मात्र सरकारी शाळा बंद पाडत अाहेे.  कर्जमाफीची प्रक्रियाही व्यवस्थित राबवली जात नाही, असा अाराेपही त्यांनी केला. 

 

भाजप, काँग्रेसला घालवा  
‘भाजप व काँग्रेस हे दोन्हीही पक्ष सापनाथ, नागनाथ अाहेत. दिल्लीत जनतेने या दाेघांनाही लाथ मारून हाकलून दिले. अाता महाराष्ट्रातूनही त्यांना हाकलून देण्याची वेळ अाली अाहे. त्यासाठी गावागावात सर्व स्तरांतील जनतेने विशेषतः युवकांनी एकत्र येत दिल्लीतील जनतेसारखा कित्ता गिरवावा,’ असे आवाहन केजरीवाल यांनी केले.


क्षणचित्रे...
- सभास्थळी भ्रष्टाचार का एकही काल केजरीवाल केजरीवाल, भारतमाता की जय आदी घोषणा देण्यात येत होता.

- जिजाऊ प्रतिमा पूजनाने संकल्प सभेला सुरुवात करण्यात आली.

- आम आदमी पक्षाच्या वतीने सभेत क्राऊड मॅनेजमेंट टीम हा उपक्रम राबविला गेल्याचे तालुक्यातील श्रोत्यांनी प्रथमच अनुभवले.
- उन्हापासून वाचण्यासाठी श्रोत्यांसोबत पत्रकारांनाही आम आदमी पक्षाच्या टोप्या परिधान केल्या होत्या.

- भाजप हा धर्म व जातीच्या नावावर भेद करीत दंगे घडवून आणनारांचा पक्ष असल्याचा उल्लेख केजरीवाल यांनी भाषणात वेळोवेळी केला.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो...

बातम्या आणखी आहेत...