आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मामाचा भाचीवर बलात्कार; भीतीपोटी लपवला प्रकार, अल्पवयीन पीडिता 7 महिन्यांची गरोदर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- खेळण्या-बागडण्याचे दिवस होते तेव्हा वडिलांचे छत्र हरवले. दोन लहान बहीण आणि एका भावाला सोडून आई देखील देवा घरी गेली. आत्याला किव आली म्हणून तिने पदरात घेतले. मात्र, या वासनेने भरलेल्या जगात आपले म्हणवणाऱ्यांनीच तिच्या अब्रुचे लचके तोडले.  32 वर्षांच्या चुलत मामानेच तिच्यावर बलात्कार केला. भीतीपोटी 15 वर्षीय पीडितेने हा प्रकार लपवला. परंतु, पीडिता 7 महिन्यांची गरोदर राहिल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला.

 

दोन्ही आरोपींच्या विरोधात हर्सुल पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मनिष कल्याणकर यांच्या नेतृत्त्वात सुरु आहे.

 
सूत्रांनुसार, पीडिता ही जाधववाडी परिसरातील आहे. कृष्णा प्रकाश पोपळघट (32, रा.रेल्वे रूळाजवळ, जयभवानीनगर, मुकुंदवाडी) असे अत्याचारी मामाचे नाव आहे. तो मार्केटिंग करतो. तर दुसरा संशयित हा इयत्ता दहावीत शिक्षण घेत असून तो अल्पवयीन (15 वर्षे) आहे. विशेष म्हणजे या मामाने पीडितेला पाण्यातून गुंगीचे औषध देत पहिल्यांदा तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर धमकी देत चार वेळा हा प्रकार केल्याचे पीडीतेने फिर्यादीत म्हटले आहे.

 

पोलिसांनी आता गर्भ तपासणीसाठी पीडीतेची डीएनए चाचणी केली जाणार असल्याचे सांगितले. पीडितेच्या वडिलांचे आठ वर्षांपूर्वी तर आईचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. सध्या ती आत्याकडे राहायला आहे आत्या मोल मजुरी करुन कुटुंब चालवते. त्याच गल्लीत पीडीतेच्या आईच्या आत्याचे देखील घर आहे. तिच्या आईच्या आत्याचा अल्पवयीन मुलगा ऑक्टोबर 2017 मध्ये तिला घरी घेऊन गेला. तेथे त्याने पीडितेला थांबण्याचा आग्रह केला. घरात कुणीही नसल्याने पीडितेने त्याला थांबण्यास नकार दिला होता. मात्र, त्याने बळजबरी करत तिला घरात खेचले. तेथे तिच्यावर अत्याचार केला. पण पीडीतेने घडलेला प्रकार आत्याला सांगण्याचे टाळले. नेहमी आजी-आजोबाला भेटण्यासाठी पीडीता मामा कृष्णा पोपळघट याच्यासोबत जायची. या घटनेनंतर काही दिवसांनी कृष्णा पोपळघट रुग्णालयात आला. त्याने नेहमीप्रमाणे तिला आजी-आजोबाची भेट घालून देतो असे म्हणत स्वत:च्या घरी नेले. पोपळघटच्या घरी पोहोचल्यानंतर पीडीतेने त्याला त्याच्या पत्नीबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने तिच्याशी भांडण झाले असून, आता ती सोबत राहत नसल्याचे म्हणाला. याचवेळी त्याने पाण्यातून पीडीतेला गुंगीचे औषध देत तिच्यावर अत्याचार केला. अत्याचारानंतर शुध्दीवर आलेल्या पीडीतेला पोपळघटने पुन्हा रुग्णालयात नेऊन सोडले. या घटनेनंतर त्याने वारंवार चारवेळा तिच्यावर अत्याचार केला. त्यातून पीडीतेला गर्भधारणा झाली. हा प्रकार पीडीतेच्या आत्याच्या निदर्शनास आला. तिने पीडीतेची वैद्यकीत तपासणी केली. तेव्हा डॉक्टरांनी ती सात महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. त्यामुळे नातेवाईकांनी तिच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरु केला. त्यावेळी तिने घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगितला. दरम्यान, मंगळवारी पीडीतेला घेत तिच्या नातेवाईकांनी हर्सुल पोलीस ठाणे गाठले. पीडीतेच्या तक्रारीवरुन अल्पवयीन बालक व पोपळघट यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा पुढील तपास महिला उपनिरीक्षक सरला गाडेकर करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...