आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत पिसाळलेल्या कुत्र्यांचा त्रास; महापालिका सुरु करणार स्वतंत्र रुग्णालय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मागील 10 दिवसांत शहरात कुत्र्यांनी 26 जणांना चावा घेतल्याने सोमवारच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवक प्रशासनावर संतप्त झाले होते. प्रशासनावर कारवाई करत नसल्याचा आरोप करण्यात आला. दुसरीकडे सुप्रीम कोर्टाचे आदेश असल्याने मोकाट कुत्र्यांना पकडण्यात अडचणी येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

 

प्रशासनाने कुत्रे पकडण्याच्या कारवाईला जोर द्यावा, माणसाच्या जीवापेक्षा कुत्र्याचा जीव मोलाचा नाही, तेव्हा नियमाकडे डोळेझाक करून कारवाई करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. कुत्रे पकडण्याची मोहीम जोमाने करण्याबरोबरच श्वानदंशानंतर सर्व उपचार महापालिकेने करावेत, त्यासाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू करावेत, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले. हे रुग्णालय २४ तास सुरू कसे राहील, याचेही नियोजन करावे, असे घोडेले यांनी सांगितले. शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठातांशी चर्चा करून रुग्णालय कोठे सुरू करायचे हे ठरवण्यात येणार आहे.

 

कुत्रे पकडण्यात प्रशासनाचा निव्वळ निष्काळजी पणा असल्याचा ठपका महापौरांनी ठेवला. प्रशासनाने मोहीम हाती घेण्यासाठी कृती आराखडा (अॅक्शन प्लॅन) तयार करावा, 8 दिवसांत सर्व वार्डात जावून कुत्रे पकडावेत, तातडीने अॅनिमल शेल्टर उभारून कुत्र्यांच्या शस्त्रक्रियेची व्यवस्था करावी, आणखी दोन डॉग व्हॅन खरेदी कराव्यात आणि जेथे कुत्र्यांची संख्या जास्त तेथे रात्रीचे दिवे बंद राहणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आदेश घोडेले यांनी दिले.

 

सकाळी 6 ते 9 आणि रात्री 10 ते 2
महापालिका पथकाने दिवसभर कारवाई न करता सकाळी 6 ते 9 आणि रात्री 10 ते 2 या वेळात कारवाई करण्याचे आदेशही आज देण्यात आले. कारण याच वेळात कुत्र्यांचा उपद्रव वाढलेला असतो. महापालिका पथक कार्यालयीन वेळेत कुत्रे पकडण्यासाठी जातात, तेव्हा कुत्रे कोठेतरी झोपलेले असतात. त्यामुळे कारवाईची वेळ बदल्याचे सांगण्यात आले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... नगरसेवकांच्या तक्रारी... 51 हजारांचे बक्षीस... अन् प्रशासकीय चित्र...कुत्रे पकडण्यासाठी फक्त 9 कर्मचारी

बातम्या आणखी आहेत...