आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढाब्यावर जेवणासाठी गेलेल्या 3 मित्रांना अज्ञात वाहनाने चिरडले; दोघे जागीच ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ढाब्यावर जेवणासाठी गेलेल्या तीन जीवलग मित्रांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर तिसरा गंभीर जखमी झाला आहे. मंगळवारी मध्यरात्री पडेगावजवळ पठाण ढाब्याजवळ हा अपघात झाला.

 

श्रीकांत शिवाजी हिवाळे (वय- 23, रा.पडेगाव), शुभम उर्फ सनी सुरेश राऊत (वय-21,रा. नंदनवन कॉलनी) हे दोघे जागीच ठार झाले आहेत. आकाश रमेश सोनवणे (वय-27, रा.माजी सैनिक कॉलनी, पडेगाव) हा गंभीर जखमी झाला आहे. श्रीकांत, शुभम व आकाश हे लहानपणापासून जीवलग मित्र होते.

 

मंगळवारी रात्री तिघेही ढाब्यावर जेवणासाठी दुचाकीवर दौलताबाद परिसरात गेले होते. रात्री एकच्या सुमारास घरी परतत असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात श्रीकांत व शुभम हे दोघे जागीच ठार झाले. अपघात एवढा भीषण होता की दुचाकीचा अक्षरक्ष: चेंदामेंदा झाला आहे. धडक बसताच दुचाकी दूर फेकली गेली. आकाशच्या चेहर्‍याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत.

 

श्रीकांत हा एका मोबाइल कंपनीत कामाला होता, तर शुभम लग्‍न समारंभात फोटो काढण्याचे काम करत होता. जखमी आकाश हा शरणापूर परिसरातील पेट्रोल पंपावर कामाला होता. विशेष म्हणजे तिघेही आपल्या आई-वडिलांचे एकुलते एक व घरातील कमावते होते. तिघांचा मित्र परिवार मोठा असल्यामुळे घाटीतील शवागृहासमोर नातेवाईक व मित्रांची मोठी गर्दी जमली होती. या याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

 

पुढीलवर क्लिक करून पाहा... अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो..

बातम्या आणखी आहेत...