आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केबीसी घोटाळ्याचा मुख्य संशयित भाऊसाहेब चव्हाणला जामीन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- राज्यासह देशभरातील गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा केबीसी कंपनीचा मुख्य संचालक भाऊसाहेब चव्हाण यास अखेर जामीन मंजूर झाला आहे. शनिवारी (दि. १९) जिल्हा न्यायाधीश पांडे यांच्या कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला. केबीसी कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना दामदुप्पट पैशाचे आमिष देत कोट्यवधींच्या ठेवी जमवत चव्हाण सिंगापूरला पळून गेला होता. तत्कालीन पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी इंटरपोलच्या मदतीने त्यास पत्नी आरतीसह मुंबईत अटक केली होती. 

 

नाशिकरोड कारागृहात असताना त्याचा राज्यातील विविध पोलिस ठाणे आणि राजस्थान पोलिसांनी ताबा घेतला होता. सध्या चव्हाण मध्यवर्ती कारागृहात आहे. जामिनाची कागदपत्रे सोमवारी न्यायालयात सादर होणार असल्याने आणखी एक रात्र चव्हाणला कारागृहात रहावे लागणार आहे. दरम्यान, या निकालाने गुंतवणूकदारांमध्ये नाराजी पसरली आहे. 

बातम्या आणखी आहेत...